Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, April 27, 2022

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गटसाधन केंद्र शिक्षण विभाग उदगीर च्या वतीने शैक्षणिक स्टॉल बाला उपक्रम व Alexa baby doll चे प्रदर्शन





अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात  गटसाधन केंद्र शिक्षण विभाग उदगीर च्या वतीने शैक्षणिक स्टॉल बाला उपक्रम व Alexa baby doll चे प्रदर्शन

 उदगीर -    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर 2022 येथे गटसाधन केंद्र शिक्षण विभाग उदगीर च्या वतीने दिनांक 22/4/2022 ते 24 /4/2022 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे  आयोजित करण्यात आले. या स्टॉल मध्ये शाळा स्तरावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प लातूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा बाला उपक्रम ( Bala- building as learning aids) या उपक्रमांचे अतिशय सुंदर मॉडेल तयार करण्यात आले होते. या मॉडेल मध्ये संपूर्ण बाला उपक्रमांसाठी तयार करण्यात आलेली जिल्हा परिषद ची शाळा उभारण्यात आली होती. तसेच या  उपक्रमाचे फलीत उपक्रमातून अतिशय गुणवान , हुशार, शिष्यवृत्ती व नवोदय पात्र विद्यार्थ्यांनी 
कशी तयार झाली आहे याचे प्रतिक म्हणून Alexa baby doll model उभारण्यात आले. या Alexa ला जगातील कोणताही प्रश्न विचारला तर या चे उत्तर अचूक अगदीच तत्पर ने देते. या Alexa ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर 2022 चे प्रमुख आकर्षण ठरले. विशेष करून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व प्रचंड उत्साह दाखवला. अनेक प्रश्नांची उत्तरे अचूक देत असल्याने विद्यार्थ्यांना खुपच आनंद व उत्साहाने विविध प्रकारचे प्रश्न विचारत होते. या स्टॉल ला विद्यार्थी, शिक्षक व पालकाची खूप गर्दी केली.  स्टॉल प्रमुख संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर बडगे,परमेश्वर श्रंगारे, शांतकुमार बिरादार, विद्यासेवक, गणेश रावजी, श्रीमती शिरूरे मॅडम, श्रीमती रेश्मा शेख, चुळबुळकर, विजय पवार तसेच मार्गदर्शक  गटशिक्षणाधिकारी मा. नितीनजी लोहकरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री संजय शिंदाळकर, वसंतराव सुर्यवंशी, केंद्रप्रमुख मारोती लांडगे, एस. पी. मुंडे,  विषय तज्ञ ज्ञानोबा मुंढे, दत्ता केंद्रे, बाळू पेध्देवाड, सहाय्यक बालाजी मुतंगे, रोहणीकर शुभांगी, कला शिक्षक शिनगारे आदींनी परिश्रम घेतले. आदींनी या स्टॉल  ची मांडणी केली.या स्टॉल ला शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. श्री विकास खारगे,मा. राज्य मंत्री संजय जी बनसोडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिनवजी गोयल साहेब, शिक्षणाधिकारी मा. श्रीमती वंदना फुटाणे मॅडम, मा. तृप्तीताई अंधारे मॅडम, पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे साहेब, जिल्हा परिषदेचे सभापती, आजी व माजी, कवि भारत सातपुते, शिक्षक संघटनेचे नेते शिवाजीराव साखरे, विविध संघटनेचे नेते, सर्व महाराष्ट्रातील शिक्षण प्रेमी व साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे सन्मानिय सदस्य तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांतील साहित्यिक व विविध वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार बांधव आवर्जून भेट दिली व सविस्तर माहिती घेतली. तसेच इतर  भेट देणाऱ्या नागरीकांना शिक्षण विभागाने राबवित असलेल्या बाला उपक्रम व Alexa baby doll या उपक्रमाची सविस्तर माहिती स्टॉल प्रमुख संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर बडगे,परमेश्वर श्रंगारे, शांतकुमार बिरादार, विद्यासेवक, गणेश रावजी, श्रीमती शिरूरे मॅडम, श्रीमती रेश्मा शेख, चुळबुळकर, विजय पवार यांनी भेट देणाऱ्या अधिकारी वर्ग, विद्यार्थी, शिक्षक व पालक, शिक्षक प्रेमी व साहित्यिक यांना  सर्वांना सांगितले की लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री अभिनव गोयल साहेबांच्या संकल्पनेतील बाला (building as a learning aids) हा उपक्रम लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. हा उपक्रम अतिशय विद्यार्थी उपयुक्त आहे. शालेय इमारत हे भौतिक शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोग करण्यात आले आहे. असे सांगितले. विद्यार्थ्यांनी वर्गातील, व्हरांड्याच्या, मैदान व संरक्षण भिंत या सर्व बाबींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे असे सांगितले तसेच शालेय संरक्षण भिंती वर समाजात जन जाग्रती करण्यासाठीचे रक्तदान, स्त्री भ्रूण हत्या, दारु बंदी, स्वच्छता व बाला उपक्रमांतील विविध 28 घटक शाळेचा नकाशा, डॉट ग्राफ, शब्द भिंती, व्हरांड्याच्या दूरूस्ती कामामध्ये करावयाची पेंटिंग, बैठकीत जमिनीवर पटाचे खेळ, सावली देणारे झाडे, सांडपाणी पासून छोटी बाग, टपाल पेटी, जुन्या टायर पासून खेळणी, वेस्ट रंगीत टाईल्स उपयोग, घड्याळासह वर्गखोल्यात दिनदर्शिका, खांबाभोवती सुर्यमाला, फर्निचर वजन नोंदविणे, पक्षासाठी झाडावर अन्न व पाणी सोय, नैसर्गिक हवा व प्रकाशासाठी योग्य दरवाजे खिडक्या.परीसरातील झाडाभोवती कठडे, पायर्‍या ऐवजी रॅम्प, रॅम्प चा रोलिंग फोन, उघड्यावर सौरघड्याळ, लपंडाव भिंत, अॅम्पिथियटर, रेनवाटर हार्वेस्टिंग, बायोगॅस, गांडूळ खत निर्मिती, ठसे उमेटविण्यासाठी पृष्ठभागावर निर्मिती, गिलाव्यात कोरलेली अक्षरे व अंक, खिडक्याला ग्रील, वर्गखोल्या च्या मागील बाजूस ओटा, दोन वर्गातील रिकाम्या जागा वापर, अंतर दर्शविणारे मैलाचे दगड, दिशा दर्शक फलक, जाळीदार भिंतीवर सुर्यप्रकाश, मैदान /क्रिंडागण ओपन जिम, खिडक्याला अंक व अक्षरे जाळी, मुलांच्या उंची नुसार फलक बसविणे, पंख्याचे रंगचक्र, व्हरांड्यात बैठक व्यवस्था, उंची मापक भिंतीवर लिहणे, दरवाजा तील कोनमापक व विद्यार्थाना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त अभ्यासक्रम चित्र रुप रेखाटन करण्यात केले आहे असे सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. 





  

































No comments:

Post a Comment