*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन उत्साहाने साजरा*
तिवटग्याळ .........आज दिनांक 29/4/2022 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ते शिक्षक या पदाविषयी लिखीत स्वरुपात त्यांचे कार्य लिहून देण्यात आले. या प्रमाणे कू. तवर खुशी- मुख्याध्यापक, अक्षरा पाटील - शिक्षीका,श्रेया श्रीमंगले- शिक्षिका, महेश पाटील - शिक्षक, इबितवार अंतेश्वर - शिक्षक या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदा विषयी सविस्तर लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. या प्रमाणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तासीका प्रमाणे विद्यार्थ्यांना आनंदी, उत्साहाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना खूप मज्जा आली असे बोलून दाखविले. तद्नंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेस स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षक मंत्री मौलाना अब्दुल कलाम यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर स्वंयशासन दिन साजरा केला बद्दल अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनीं मुख्याध्यापक तवर खुशी व आभारप्रदर्शन महेश पाटील यांनी मानले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर,अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment