Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 26, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने संविधान दिन साजरा.

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने संविधान दिन  साजरा.

तिवटग्याळ - आज दिनांक 26/11/2022 रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे परीपाठानंतर मोठ्या उत्साहाने      26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले  यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  तसेच सामुहिक संविधानाची शपथ घेतली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी   संविधान तयार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे भारत रत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या कार्या विषयावर योगदान सविस्तर माहिती दिली. तसेच आज 26/11 /2008 रोजी शहिद झालेल्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे,विजय साळसकर, प्रकाश कामठे, तुकाराम ओंबळे, इतर अधिकारी यांच्या विषयी माहिती   दिली तसेच दोन मिनिटे मौन धारण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे  यांनी मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



























No comments:

Post a Comment