तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता- पालक गट अंतर्गत पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून साधन व्यक्ती श्री गोविंद भोळे यांची भेट*
*तिवटग्याळ - आज दिनांक 23/11/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गटास अचानक पर्यवेक्षीय अधिकारी साधन व्यक्ती श्री गोविंद भोळे यांनी भेट दिली. या गटास शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरी इयत्तेच्या माता - पालक गट व लिडर माता व सदस्य यांना बोलावण्यात आले. तद्नंतर या निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गटास भेट देण्यासाठी आलेले आदरणीय श्री गोविंद भोळे यांचा गावच्या सरपंच सौ. उज्ज्वला ताई नरहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर या निपुण भारत अभियानांतर्गत माता पालक गट तयार झाले आहेत का, लिडर माता कोण आहेत, Idea Video पाहिला आहेत का, तो विद्यार्थ्यांना दाखवला आहात का या विषयावर सविस्तर माहिती लिडर माता व सदस्यांना विचारली. तसेच या निपुण भारत अभियान अंतर्गत माता - पालक गटाची उध्दीटे, निकष, कार्य या विषयावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन श्री गोविंद भोळे यांनी केले. माता - पालक गटाला दर आठवड्याला एक Idea Video शैक्षणिक उपक्रम आपणांस दिला जाणार आहे तो उपक्रम आपल्या वार्डातील इयत्ता पहिली ते तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे असे सांगितले व प्रत्यक्षात काही उपक्रम माता - पालक गट सदस्य व लिडर मातांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी दाखले. स्मरण शक्ती खेळ वेगवेगळ्या वस्तू टेबलावर मांडून दाखवणे व नंतर त्या वस्तू झाकून डोळे बंद करून क्रमाने सांगितले, टेबलावर व टेबलाखाली विविध वस्तूंची मांडणी करुन वस्तू टेबलावर आहेत की खाली पुर्ण वाक्यात सांगणे. अशा विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती देउन निपुण उत्सव साजरा केला. शासनाने दर आठवड्याला एक Idea Video देणार आहेत. आतापर्यंत दहा Idea Video दिलेले आहेत ते लिडर मातांनी आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांना दाखवून सविस्तर मार्गदर्शन करावे असे सांगितले. या वेळी . उज्ज्वला ताई नरहरे सरपंच, गीता कच्छवे,, प्रियंका तोमर पाटील, स्मिता पाटील,मंदाकिनी पाटील, आरती तवर, संगीता बिरादार, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते. उपस्थित महीलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी केले व उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. चहापानानंतर निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गटास भेट देण्यासाठी आलेले साधन व्यक्ती श्री गोविंद भोळे यांच्या परवानगीने बैठकीची सांगता करण्यात आली*
No comments:
Post a Comment