Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, August 19, 2023

जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दावणकर, सरचिटणीस बालाजी गारमपल्ले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे व कोषाध्यक्ष साईनाथ तोटावार

*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती लातूर, जिल्हा अधिवेशन व जिल्हा कार्यकारिणी निवड संपन्न*

*जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दावणकर, सरचिटणीस बालाजी गारमपल्ले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे व कोषाध्यक्ष साईनाथ तोटावार*

लातूर दि.  6/8/2023 
 महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक  समिती जिल्हा  लातूर ,जिल्हा अधिवेशन व जिल्हा कार्यकारिणीची निवड अत्यंत खेळीमेळीत करण्यात आली.  अधिवेशनाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ)- राज्याध्यक्ष, उदघाटक मा. दिलीप ढाकणे- संस्थापक अध्यक्ष औरंगाबाद, मा. के. सी. गाडेकर- शिक्षक नेते औरंगाबाद, मा. रामकिशन लटपटे- राज्य कार्यालयीन चिटणीस परभणी, विशेष अतिथी- मा. डॉ. पी. एन. सगर माजी उपप्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर तथा प्रशासक ब्रिलियंट महाविद्यालय लातूर. मा. योगीराज माने- सुप्रसिद्ध कवी तसेच असंघटित कामगारांचे नेते श्री. राजकुमार होळीकर इ .मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करून अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रथमत: महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे राज्य उपाध्यक्ष मा. चंदू अण्णा घोडके यांनी प्रास्ताविकात आदर्श शिक्षक समितीचा इतिहास मांडला. आजपर्यंत संघटनेने केलेले उल्लेखनीय कार्याची माहिती माहिती प्रास्ताविकात सांगितली. तद्नंतर संस्थापक अध्यक्ष मा. दिलीपराव ढाकणे, राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ) व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . उपस्थितांना संघटनात्मक पातळीवरील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे सुत्रसंचलन मा. मारोती लांडगे- उदगीर तालुका अध्यक्ष यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. दिलीपराव ढाकणे यांनी आभार प्रदर्शनात आदर्श शिक्षक समिती कार्यकर्त्याला सूचना देण्यात आल्या.  आदर्श शिक्षक समितीचे ध्येयधोरणे सांगितले विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या शैक्षणिक वाटचालीतील अडी अडचणी समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. तसेच संघटनेत विविध पदावर निवड केलेल्या नूतन   पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या जिल्हा अधिवेशनात दिलेल्या सूचनेनुसार  राज्यस्तरीय व जि प स्तरीय विविध प्रश्नांवर जिल्हा परिषद लातूर व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोर विविध प्रलंबित प्रश्नावर आंदोलन करण्याचे ठरले. त्या आंदोलनास सर्व पदाधिकारी उपस्थित राहून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती  लढत राहील असेही सांगितले. तद्नंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. !!!!

*आदर्श शिक्षक समिती लातूर*
*लातूर जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे.*
(सन 2023 ते 2026 )

*⛔जिल्हा अध्यक्ष* 
 *मा. लक्ष्मण दावणकर*

⛔ *जिल्हा सरचिटणीस* 
*मा. बालाजी गारमपल्ले*


   *जिल्हा उपाध्यक्ष* 
*⛔नामदेव बिरादार उर्फ नाना*
*⛔शिवलिंग मार्गपवार*
*⛔शिवदत्त पांचाळ*

  *जिल्हा कार्याध्यक्ष* 
*⛔मा. ज्ञानेश्वर बडगे*

  *जिल्हा कोषाध्यक्ष* 
*⛔मा. साईनाथ तोटावार (रेड्डी)*


  *जिल्हा संपर्क प्रमुख* 
*⛔मा. प्रदीप तळेगांवकर*
*⛔सुर्यकांत बोईनवाड*

 *प्रसिद्धी प्रमुख* 
*⛔मा. संतोष पाटील करडखेलकर*

 *जिल्हा प्रवक्ते* 
*⛔विवेक होळसंबरे*
*⛔बापूराव चामले*
*⛔नामदेव चोले*

*जिल्हा नेते*
*⛔वाल्मिक पंदे*
*⛔गंगाधर बिरादार*

 *जिल्हा सहसचिव* 
*⛔डॉ. दिनेश भिसे*
*⛔राजकुमार कुंभारकर*

 *जिल्हा संघटक* 
*⛔सुधाकर केंद्रे*

 *प्रमुख सल्लागार* 
*⛔डाॅ. बालाजी समुखराव*
*⛔रमेश हाणमंते*

 *जिल्हा शिक्षक नेते* 
*⛔रामेश्वर कदम*

    *निमंत्रित सदस्य* 
*⛔उदगीर - शाम राठोड* 
*⛔निलंगा - राम सगरे* 

*⛔ जि.प.प्रशाला माध्यमिक विभाग अध्यक्ष*
 *श्री.सुरेश होळकर* 

 *महिला आघाडी जिल्हा प्रमुख* 
*⛔महानंदा तांदळे (कराड)*

 *महिला जिल्हाअध्यक्ष* (खाजगी माध्यमिक)
*⛔जयश्री सगर*

 
 *सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती लातूर यांच्या वतीने हार्दीक हार्दीक अभिनंदन!*
*भावी कार्यास शुभेच्छा !!* 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏👏👏👏👏🏻




















































































No comments:

Post a Comment