Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, August 19, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत ग्रामसभा व शालेय विद्यार्थाच्या चित्रकला स्पर्धा आयोजित

*🇳🇪तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत ग्रामसभा व शालेय विद्यार्थाच्या चित्रकला स्पर्धा आयोजित*

*तिवटग्याळ - आज दिनांक 7/8/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत ग्रामसभा व शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, सरपंच प्रशांत, शाळा व्यवस्थापन चे उपाध्यक्ष मा. कैलास तवर, विनोद बिरादार, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, बचतगट अध्यक्षा गिताताई कच्छवे, जयदेवी पाटील, मनिषा कांबळे, वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी प्रभात फेरीत विविध देशभक्तीपर घोषणा देत रॅली काढण्यात आली. तद्नंतर ग्रामसभेत मा. सरपंच प्रशांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत विविध विषयांवर व उपक्रमांचे सविस्तर माहिती सांगितली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मा. प्रशांत जी, उपाध्यक्ष कैलास तवर, विनोद बिरादार, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, बचतगट अध्यक्षा गीता कच्छवे, जयदेवी पाटील, मनिषा कांबळे, वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे मानले*



















No comments:

Post a Comment