Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, September 22, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात 17 सप्टेंबर मराठवाडा अमृतमहोत्सव मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात 17 सप्टेंबर मराठवाडा अमृतमहोत्सव मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा* 

*तिवटग्याळ ....... तिवटग्याळ ता. उदगीर जि लातूर येथे दिनांक 17/9/2023 रोजी  75  वा मराठवाडा अमृतमहोत्सव मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके,मा. सरपंच प्रशांत पाटील, ग्राम सेवीका भाग्यश्री आमले, उपाध्यक्ष कैलास तवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण प्रेमी मा. पोलीस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, ग्राम पंचायत सदस्य जनार्दन पाटील, जयशिंग पाटील, सरूबाई कांबळे, प्रवीण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .व ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम पंचायत सदस्य मा. सरूबाई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर  शाळेत शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, मा. देविदास पाटील तंटामुक्त अध्यक्ष, जनार्दन पाटील ग्राम पंचायत सदस्य, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयावर सविस्तर माहिती दिली.  शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे  यांनी गावचे सरपंच प्रशांत पाटील यांच्या उपक्रमातून अंगणवाडी च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येत आहे असे सांगितले व सरपंच प्रशांत पाटील यांचा हा अभिनंदनीय उपक्रम आहे या उपक्रमांचे फलीत अंगणवाडी च्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे या बद्दल सरपंच प्रशांत पाटील  यांचा गौरव व कौतुक करणे आहे सांगुन मा. सरपंच प्रशांत पाटील यांना अभिनंदन करुन हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सरपंच प्रशांत पाटील यांनी शाळेला किचन शेड उपलब्ध नसल्याने त्यांनी लगेचच तात्काळ किचन शेड उपलब्ध करून देत आहे असे सांगितले व या बद्दल मा. सरपंच प्रशांत पाटील यांच्या शाळेच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या व विद्यार्थाच्या वतीने अभिनंदन करुन हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरपंच प्रशांत पाटील यांनी शाळेतील आवश्यक ते सर्व बाबी उपलब्ध करून देत आहे या शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे बोलून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रितीका शिवराज पाटील यांनी अतिशय सुंदर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी भाषण केले. या वेळी समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके,मा. सरपंच प्रशांत पाटील, ग्राम सेवीका भाग्यश्री आमले, उपाध्यक्ष कैलास तवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण प्रेमी मा. पोलीस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, ग्राम पंचायत सदस्य जनार्दन पाटील, जयशिंग पाटील, सरूबाई कांबळे, प्रवीण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले  आदी जण शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, प्रास्ताविक  व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*.























































No comments:

Post a Comment