Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, September 22, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गणेश चतुर्थी या सणाच्या निमित्ताने गणेश मुर्ती प्रदर्शन आयोजित

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गणेश चतुर्थी या सणाच्या निमित्ताने गणेश मुर्ती प्रदर्शन आयोजित*

*तिवटग्याळ - आज दि.20-9-2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या च्या वतीने आज दिनांक 20/9/2023 रोजी गणेश चतुर्थी या सणा च्या निमित्ताने कला कार्यानुभव या विषयावर अंतर्गत माती कामा पासून गणेश मुर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रथम शाळेतील परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की आज आपण गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी कला कार्यानुभव या विषया अंतर्गत माती कामा पासून गणेश मुर्ती करुन आणावे व प्रदर्शन मांडण्यात यावे व या गणेश मुर्ती प्रदर्शनात प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थाना वही व पेन बक्षीस म्हणून दिले जाणार आहे असे सविस्तर सांगितले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी माती पासून तयार करण्यात आलेल्या गणेश मुर्ती चे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी गणेश चतुर्थी या सणा विषयी सविस्तर माहिती दिली. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदू धर्मानुसार, या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं. या दिवशी लाडक्या गणरायाची मूर्ती जयघोषात घरी आणतात आणि त्याची स्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते.जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो. तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे, विशेषतः अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता) आणि नशीब आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो. कला आणि विज्ञानाचा संरक्षक; तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. सुरुवातीसाठीचा देव म्हणून, त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते. लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षक म्हणून गणेशाचे आवाहन केले जाते. अनेक ग्रंथ त्याच्या जन्म आणि पराक्रमांशी संबंधित पौराणिक कथा सांगतात. गणपती चे श्रीक्षेत्र अष्टविनायक खुप जाग्रत व पावन आहेत. अनेक गणेश भक्त आवर्जून या क्षेत्राला भेट देतात. १ मोरगांव, २थेऊर, ३ सिद्धटेक, ४ रांजणगाव, ५ ओझर, ६ लेण्याद्री, ७ महड, ८ पाली. हा गणेश चतुर्थी सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. सविस्तर माहिती दिल्या नंतर शाळेतील मांडलेल्या गणेश मुर्ती प्रदर्शन पाहण्यात आले. प्रदर्शनातून प्रथम क्रमांक गणेश राजकुमार श्रीमंगले, द्वितीय क्रमांक रितीका शिवराज पाटील , तृतीय क्रमांक सरस्वती अनिल पाटील तसेच प्रोत्साहन पर इंद्रजीत नवनाथ कच्छवे, मंदिरा रमेश साळुंके, अर्थव कैलास तवर, गंगासागर बिरादार, वेदांत पाटील, शैलेश पाटील यांना अभिनंदन करुन शैक्षणिक साहित्य वही व पेन बक्षीस देऊन आले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*









































No comments:

Post a Comment