Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 2, 2023

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची आदर्श शिक्षक समिती लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

*मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची आदर्श शिक्षक समिती लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड*

लातूर- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक  समिती लातूर जिल्हा अधिवेशन व जिल्हा कार्यकारिणीची निवड अत्यंत खेळीमेळीत करण्यात आली. उदगीर तालुक्यातील आदर्श व उपक्रमशील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची आदर्श शिक्षक समिती च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर बडगे यांना शैक्षणिक, सामाजिक व संघटनेच्या उत्कृष्ट कार्यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या पुर्वी ज्ञानेश्वर बडगे उदगीर तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्ट योगदान आदर्श शिक्षक समिती लातूर ला दिले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा कार्याध्यक्ष अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली आहे. या जिल्हा अधिवेशनात अध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ)- राज्याध्यक्ष, उदघाटक मा. दिलीप ढाकणे- संस्थापक अध्यक्ष औरंगाबाद, मा. के. सी. गाडेकर- शिक्षक नेते औरंगाबाद, मा. रामकिशन लटपटे- राज्य कार्यालयीन चिटणीस परभणी, विशेष अतिथी- मा. डॉ. पी. एन. सगर माजी उपप्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर तथा प्रशासक ब्रिलियंट महाविद्यालय लातूर. मा. योगीराज माने- सुप्रसिद्ध कवी तसेच असंघटित कामगारांचे नेते श्री. राजकुमार होळीकर इ .मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन करून अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रथमत: महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे राज्य उपाध्यक्ष मा. चंदू अण्णा घोडके यांनी प्रास्ताविकात आदर्श शिक्षक समितीचा इतिहास मांडला. आजपर्यंत संघटनेने केलेले उल्लेखनीय कार्याची माहिती माहिती प्रास्ताविकात सांगितली. तद्नंतर संस्थापक अध्यक्ष मा. दिलीपराव ढाकणे, राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ) व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . उपस्थितांना संघटनात्मक पातळीवरील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे सुत्रसंचलन मा. मारोती लांडगे- उदगीर तालुका अध्यक्ष यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. दिलीपराव ढाकणे यांनी आभार प्रदर्शनात आदर्श शिक्षक समिती कार्यकर्त्याला सूचना देण्यात आल्या.  आदर्श शिक्षक समितीचे ध्येयधोरणे सांगितले विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या शैक्षणिक वाटचालीतील अडी अडचणी समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. तसेच संघटनेत विविध पदावर निवड केलेल्या नूतन   पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या जिल्हा अधिवेशनात दिलेल्या सूचनेनुसार  राज्यस्तरीय व जि प स्तरीय विविध प्रश्नांवर जिल्हा परिषद लातूर व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोर विविध प्रलंबित प्रश्नावर आंदोलन करण्याचे ठरले. त्या आंदोलनास सर्व पदाधिकारी उपस्थित राहून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती  लढत राहील असेही सांगितले. तद्नंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.आदर्श शिक्षक समिती लातूर जिल्हा कार्यकारणी(सन 2023 ते 2026 )साठी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती लातूर यांच्या वतीने हार्दीक हार्दीक अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.











No comments:

Post a Comment