Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 2, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राखी पौर्णिमा रक्षाबंधन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राखी पौर्णिमा रक्षाबंधन उत्साहाने साजरा*

*तिवटग्याळ - दिनांक 2/9/ 2023 रोजी शनिवारी सकाळी परीपाठानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले की आज आपल्या शाळेत राखी पौर्णिमा रक्षाबंधन साजरे करायचे आहे असे सांगितले व या राखी पौर्णिमा रक्षाबंधन विषयावर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी सविस्तर माहिती दिली. रक्षाबंधन हा सण म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधून भावाने बहिणीचे रक्षण करणे असे जरी असले तरी सर्व महिलांचे रक्षण करण्यासाठी अशा धाडसी पुरुषाकडून रक्षण करणे हा धर्म समजला जातो. आपल्या देशात परकीय  होणारे आक्रमण आणि त्यातच स्त्रियांना होणारा त्रास यासाठी स्त्रियांचे रक्षण व्हावे यासाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो. परकीय आक्रमण थांबवण्यासाठी बहीण आपल्या भावाच्या मनगटात राखी बांधून त्याचेही रक्षण व्हावे म्हणून राखी बांधली  जात असे. या सणाला धार्मिक धार्मिक महत्त्व आहे. तसेच हा सण कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा म्हणून खूप महत्त्वाचा मानला  जातो .याच दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्रापासून संपत्ती धन दौलत कोळी लोकांना मिळत असते, म्हणून समुद्राला नारळ अर्पण करत असतात. श्रावण महिना हा सर्व महिन्यातील एक महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात पूर्ण महिनाभर श्रद्धावान लोक महिनाभर उपवास करत असतात ,काही शुभ मुहूर्त या महिन्यात काढत असतात तर काहींना घरामध्ये  पुराण ग्रंथ वाचून महिनाभर त्याची आराधना केली जाते . संपूर्ण महिना हा लहानापासून मोठ्यापर्यंत कोणताही मांसाहार  न करता कडक पाळला जातो , असे काही लोक करत असतात आणि अशा श्रावण महिन्यात रक्षाबंधन अगदी उत्सवात साजरा केला जातो. त्यामुळे रक्षाबंधन सणाला धार्मिक महत्त्व खूप आहे.बहीणभावाचे नाते जपण्यासाठी आपण घ्यावयाची काळजी. आजकाल सगळीकडे स्वार्थ भरलेला असतानाही रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. बहीण ही स्वतःच्या संसारात व्यस्त असली तरीही एक दिवस का होईना ती  भावासाठी माहेरी जाऊन राखी बांधून येत असते. या ठिकाणी भावाकडून बहिणीला कोणतीही अपेक्षा नसते. तर भावालाही असे वाटत असते की बहिणीने येऊन आपल्या सोबत चार घास खाऊन तिच्या संसारातील होणाऱ्या घडामोडी, उत्कर्ष आनंदाने ऐकत असतो. मात्र सासरचे लोक बहिणीला भावाकडून वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळावा यासाठी तगादा लावून राहिलेले असतात. यामुळे बहिण भाऊ यांच्या नात्यांमध्ये घट आलेली अनेक उदाहरणे पाहिला मिळत आहेत . तसेच जसे बहिणीला  भावाने वडिलोपार्जित संपत्ती देण्यासाठी नकार दिला तर त्यांच्यातील नातेसंबंध संपुष्टात येण्यास सुरुवात होत असते. जरी बहिणीला संपत्तीचा वाटा दिला तर स्वतःच्या पत्नीलाही वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा मिळावा यासाठी अट्टहास  केला जात असतो. त्यामुळे या वडिलोपार्जित संपत्ती वरून अनेक वाद सध्या निर्माण होताना दिसत आहेत . यामधून बहीण आणि भाऊ दोघांच्या विचाराने आणि समजूतदारपणाने या वाटाघाटी होऊन कुठेतरी थांबले पाहिजे आणि या पवित्र रक्षाबंधनाच्या निमित्ताने का होईना एकत्र येण्यासाठी त्यांना योग चांगला जोडून आलेला असतो. अशा या घडामोडी कितीही घडत. रक्षाबंधन या सणाने बहिण भाऊ एकत्र येण्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. राखीचे  महत्व या दिवशी खूप असते. राखी ही केवळ आपल्याच भावाला बांधावी  असा नसतो. आपल्या भावाप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला आपण राखी बांधत असतो आणि हे नाते कायमस्वरूपी भाऊ-बहीण म्हणून टिकत असते तसे ते टिकवण्याचा प्रयत्नही केला जातो. रक्षाबंधन या दिवशी सर्वजण गोडी गुलाबी ने राहत असतात. बहिणीसाठी गोडधोड जेवण करून तिच्या मुलाबाळांसह खायला घालणे हा भावासाठी अत्यंत आवडीचा सण असतो. सुखदुःखात साथ देणारी बहिण ही आपली पाठीराखी असते याचा विसर या रक्षाबंधन सणामुळे पडत नाही.अशी सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व मुलांना राखी बांधली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर यांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.*









No comments:

Post a Comment