Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, October 5, 2023

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे जिल्हास्तरीय गुरुवर्य पुरस्कार 2023 पुरस्काराने सन्मानित

*मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे जिल्हास्तरीय गुरुवर्य पुरस्कार 2023 पुरस्काराने सन्मानित*

*उदगीर - GSPM (गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ) उदगीर च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा गुरूवर्य पुरस्कार 2023 दिनांक 2/10/2023 रोजी GSPM campus उदगीर येथे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व मराठवाडा मुक्ती संग्राम योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा GSPM campus उदगीर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक व रंगकर्मी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा सदस्य ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा. ना. कॅबिनेट मंत्री संजय जी बनसोडे, मा. ना. संजय राठोड, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर राहुल केंद्रे, मा. माजी नगराध्यक्ष राजेश्वर जी निटूरे, संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब राठोड, माजी सभापती ज्योती राठोड, सचिव अमीत राठोड, तहसीलदार मा. रामेश्वर गोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, पुणेरी पगडी बांधून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मा. ना. कॅबिनेट मंत्री संजय जी राठोड व मा. ना. कॅबिनेट मंत्री संजय जी बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे  अध्यक्ष मा. ना. कॅबिनेट मंत्री संजय जी बनसोडे, प्रमुख पाहुणे मा. ना. कॅबिनेट मंत्री संजय जी राठोड, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. राहूल केंद्रे, माजी नगराध्यक्ष मा. राजेश्वर जी निटूरे, तहसीलदार मा. रामेश्वर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक GSPM गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे सचिव मा. अमित राठोड व पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वाती भांगे , अनिता हैबतपुरे व वर्षा बिरादार तसेच आभारप्रदर्शन मा. पूरस्कार निवड समितीचे सचिव अनिता हैबतपुरे यांनी मानले. पुरस्कार यशस्वीतेसाठी प्राचार्य व्ही. व्ही. येळवतंगे, प्राचार्य टिम. बी. शेरे, प्राचार्य पी. डी. जाधव, प्राचार्य पी. एम. मरशिवणे, प्राचार्य अनिता हैबतपुरे, अधीक्षक संतोष बोयले आदीनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांना हा मानाचा गुरूवर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र मंडळ परिवार व रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्य समन्वय रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड  ,सचिव प्रा ज्योती मद्देवाड अ,ॅड विष्णू लांडगे ,अॅड  महेश मळगे ,रसुल दा पठान,  रविंद्र हासरगुंडे , रामदास केदार   लक्ष्मण बेंबडे ,मारोती भोसले , महादेव खळूरे ,  संदीप मद्दे , सिद्घार्थ सुर्यवंशी ,  , सचीन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर,,जहाँगीर पटेल , निता मोरे ,विवेक होळसंबरे  टी डी पांचाळ ,  बालाजी भोसले , अर्चना पाटील ,मोहसिन शेख  नारायण कुंडले ,मारोती वाघमारे ,गजानन देवकत्ते , हणमंत केंद्रे ,नागनाथ गुट्टे आदिंनी आभिनंदन केले आहे.*.









































No comments:

Post a Comment