*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दसरा विजयादशमी निमित्ताने सोने लुटणे कार्यक्रम संपन्न*
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 25/10/2023 रोजी शालेय परीपाठा नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी आज आपल्या शाळेत विजया दशमी दसरा निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आपट्याची पाने म्हणजेच सोने देऊन दसरा हा सण साजरा करण्यात येणार आहे असे सांगितले. तद्नंतर इयत्ता निहाय विद्यार्थाना सोने देऊन Happy Dashra शुभेच्छा म्हणून विजयादशमी सण साजरा करण्यात आला तसेच या विजयादशमीच्या विषयी सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सांगितले व उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सोने म्हणजे आपट्याची पाने देऊन दसरा सणा विषयी सविस्तर माहिती दिली. महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण असून, घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा हा सण आहे तसेच नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. स्वतः समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण दसरा, तमोगुण आणी वाईट शक्ती यांचा नाश होणे आणि परस्परांप्रती प्रीती जागृत होणे साधारण पणे त्रेतायुगापासुन साजरा केला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण असून या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या आयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात. विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणी वधही. पण याविषयी अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी अख्यायिका प्रचलित आहे .याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते. दसरा सणाला शास्त्र आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्या बाबत वेगळे वेगळे महत्त्व आहे प्राचीन काळापासून क्षत्रीय युद्धाला जाण्यासाठी या दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की दसर्याच्या दिवशी केलेल्या युद्धा मध्ये विजय निश्चित मिळतो.
क्षत्रीय लोकांप्रमाणे ब्राह्मण लोक देखील दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. दसरा ला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. आपट्यांची पाने
या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने परस्परांना दिले जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात .
याच दिवशी भगवान श्री रामा ने रावणाचा वध केला होता व तेंव्हा पासून हा दिवस विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण आहे असे सांगितले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार, आदी जण यांनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment