Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, May 12, 2024

तिवटग्याळ ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 64 वा महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा


*तिवटग्याळ ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 64 वा महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा* 


तिवटग्याळ ....... तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 1/5/2024 रोजी  64 वा महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम तिवटग्याळ ग्रामपंचायत कार्यालयात गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. गंगाधर नरहरे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक  व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, गावचे  सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर,पोलीस पाटील धनराज पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग पाटील,सरुबाई कांबळे, आकाश पाटील,अरुण पाटील, रावसाहेब पाटील, प्रवीण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर आदी जण उपस्थितीत होते. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण नंतर  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 असल्याने आचार संहिता लागू असल्याने कोणताही कार्यक्रम व भाषण नाही असे सांगितले व लोकसभेची निवडणूक 7 मे 2024 रोजी आहे सर्वानी मतदान करावे, कोणीही 7 मे गावाला जाऊ नये. खुपच अडचणी चे असेल पहिले मतदान मग काम असे सांगितले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, गावचे  सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर,पोलीस पाटील धनराज पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग पाटील, सरुबाई कांबळे, आकाश पाटील,अरुण पाटील, रावसाहेब पाटील, प्रवीण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर आदी जण उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले

























































No comments:

Post a Comment