*कर्लेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न*
कर्लेवाडी - कर्लेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद माहे मार्च 2025 ची दिनांक 17/3/2025 रोजी तोंडार केंद्राची शिक्षण परिषद कर्लेवाडी शाळेच्या वतीने कर्लेवाडी येथे संपन्न झाली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख मा. शेषराव राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून कें मु. संजय बिरादार, मुख्याध्यापक पंडीतराव हुरुसनाळे, काशीम शेख, जाकीर तांबोळी आदी जण उपस्थित होते.नियोजित सर्व विषयावर सुलभक पुंडलिक मुळे यांनी निपुण भारत (महाराष्ट्र) अंतर्गत अध्ययन स्तर निश्चिती व कृती कार्यक्रम, मनोहर पांडे यांनी आकलनासह वाचन शिकवणाच्या पध्दती व तंत्रे, ज्ञानेश्वर बडगे यांनी संकलित मूल्यमापन चाचणी 2,PAT-36,वार्षिक परीक्षा आयोजन व SQAAF (शाळा गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखडा) या विषयावर सविस्तर सर्व सुलकांनी मार्गदर्शन केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रशासकीय बाबी व शंकासमाधान केंद्र प्रमुख मा. शेषराव राठोड यांनी मार्गदर्शन केले तद्नंतर गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख यांची अचानक शिक्षण परीषदेला भेट दिली व सविस्तर अशी चर्चा घडवून आणली व प्रशासकीय कामांचा आढावा व निपुण महाराष्ट्र, SQAAF, नवभारत साक्षर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी या विषयावर सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेला केंद्रांतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बडगे व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पुंड यांनी केले.
No comments:
Post a Comment