जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दीपक जाधव, उपाध्यक्ष कल्पना हालसे यांची सर्वानुमते निवड
------------------------------------
आज दिनांक 21 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुर ता उदगीर जिल्हा लातूर येथे मुख्याध्यापक रमेश खंडोमलके यांच्या अध्यक्षतेखाली 2025- 2026 या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड व इतर विविध समित्या गठित करण्यात आल्या. यावेळी 2025-2027 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दीपक जाधव, उपाध्यक्षपदी कल्पना हालसे व इतर सदस्य पुनम जाधव, सुमित्रा जाधव, भागवत जाधव, पुजा भाले, वर्षा बोईवाडे, महादेव फुलवाडे,माणतेश चिमेगावे, सविता आडकुटे, गोविंद जाधव, शिक्षक प्रतिनिधी अनिता पांचाळ सचिवपदी मुख्याध्यापक रमेश खंडोमलके यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष दीपक जाधव यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करूया, असे सांगितले. शाळेतील शिक्षीका अनिता पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक रमेश खंडोमलके यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
No comments:
Post a Comment