लोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न
-------------------------------------
*लोणी - लोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद जूलै 2025 ची दिनांक 18/7/2025 रोजी तोंडार केंद्राची शिक्षण परिषद लोणी शाळेच्या वतीने लोणी येथे संपन्न झाली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी मा. नितीन लोहकरे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख मा. काशिम शेख, कें मु अ चांद पठाण, पंडित हुरुसनाळे, डॉ ज्ञानोबा मुंढे आदी जण उपस्थित होते.नियोजित सर्व विषयावर निपूण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षा निकाल, PAT 2,PAT 3, परख राष्ट्रीय सर्व्हक्षण 2024 सुलभक मनोहर पांडे, ज्ञानेश्वर बडगे यांनी सविस्तर विषयानुसार मार्गदर्शन केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रशासकीय बाबी व शंकासमाधान शिक्षण विस्तार अधिकारी मा नितीन लोहकरे, केंद्र प्रमुख मा.काशिम शेख केले. या शिक्षण परिषदेला केंद्रांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन मनोहर पांडे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक भास्कर चव्हाण यांनी केले*
No comments:
Post a Comment