डॉ. हावन्ना व टिम च्या वतीने अथर्व नरसिंग पाटील यांचा सत्कार
-------------------------------------
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर येथे दिनांक 19 जुलै 2025 रोजी शालेय परीपाठानंतर डॉ हावन्ना व त्यांची टिम सय्यद हाश्मी, पाटील एन. एस. यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी, हाताची स्वच्छता, शाळा, घर, गाव यांची स्वच्छता इत्यादी विषयांवर सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तद्नंतर इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांना धनुर्वात चे इंजेक्शन देण्यात आले. आरोग्यदायी चांगल्या सवयी व स्वच्छता या विषयावर शाळेतील विद्यार्थी इयत्ता दुसरीतील अथर्व नरसिंग पाटील यांने खुप खुप सडेतोड व अचुक उत्तर दिल्याबद्दल डॉ हावन्ना व त्यांच्या टिम ने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे, डॉ हावन्ना, सय्यद हाश्मी, पाटील एन. एस. आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment