तिवटग्याळ ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान निमित्ताने ग्रामसभा आयोजित*
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान निमित्ताने ग्रामसभा मा. उपसरपंच जयसिंग पाटील, ग्राम सभेचे सचिव म्हणून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, निरीक्षक मा. रंगवाळ साहेब यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेला सचिव म्हणून लाभलेले मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची 9 महत्त्वाची माहिती सविस्तर दिली. गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्य दायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव व सामाजिक न्याय, सुशासन युक्त गाव, महिला स्नेही व बालिका मैत्री गांव इत्यादी विषयांवर सविस्तर उपस्थित नागरिकांना दिली. या वेळी उपसरपंच जयसिंग पाटील, निरीक्षक रंगवाळ साहेब, सचिव मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, सिआरपी प्रमुख जयदेवी पाटील, श्रीदेवी कोरे, अश्विनी कांबळे, गीताताई कच्छवे, पुजा बिरादार, वर्षा श्रीमंगले, गावातील महिला वर्ग, ग्राम पंचायत सदस्य सरुबाई कांबळे, प्रवीण कांबळे, राजकुमार श्रीमंगले, विनोद बिरादार आदी जण उपस्थित होते*




No comments:
Post a Comment