Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, March 27, 2019

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक जल दिन साजरा. उदगीर वार्ता......... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज २२ मार्च 2019 रोजी 'जागतिक जल दिन' असल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक जल दिन असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक जल प्रतिज्ञा घ्यावयाची आहे व पाण्याचे महत्त्व समजून घ्यावयाचे आहे असे सांगितले. या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा सामुदायिक घेण्यात आली. आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असून, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन… मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन. जल प्रतिज्ञा नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका सुनिता पोलावार यांनी पाण्याचे महत्त्व या विषयावर सविस्तर माहिती दिली. पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बदती ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा 'जागतिक जल दिन' म्हणून निश्चित करण्यावत आला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा 'जागतिक जल दिन' म्हणूनही साजरा करण्या त आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रियो डि जेनेरियो'मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरुकता करणे हा प्रमुख उद्देश या मागे आहे. पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. पाणी टंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे तसेच माणसाच्या आत्म्याला लागणारी तहान भागवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.जगातील ८० पेक्षा कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्याप मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल. कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने जागतिक जल दिनानिमित्त दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे. २०२५ पर्यंत जगातील एक तृतिअंश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक जल दिन साजरा.


उदगीर वार्ता.........  रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत

आज २२ मार्च 2019 रोजी 'जागतिक जल दिन' असल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक जल दिन असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक जल प्रतिज्ञा घ्यावयाची आहे व पाण्याचे महत्त्व समजून घ्यावयाचे आहे असे सांगितले. या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा सामुदायिक घेण्यात आली.

आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असून, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन…

मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.

पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.

पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन. जल प्रतिज्ञा नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका सुनिता पोलावार यांनी पाण्याचे महत्त्व या विषयावर सविस्तर माहिती दिली.

पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बदती ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा 'जागतिक जल दिन' म्हणून निश्चित करण्यावत आला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा 'जागतिक जल दिन' म्हणूनही साजरा करण्या त आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रियो डि जेनेरियो'मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरुकता करणे हा प्रमुख उद्देश या मागे आहे. पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. पाणी टंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे तसेच माणसाच्या आत्म्याला लागणारी तहान भागवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल!

नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.जगातील ८० पेक्षा कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्याप मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल. कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने जागतिक जल दिनानिमित्त दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे.

२०२५ पर्यंत जगातील एक तृतिअंश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत व शिवशंकर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उदगीर किल्ला, साखर कारखाना व साईधाम पर्यटन स्थळास भेट. उदगीर वार्ता....... रावणगाव नविन वसाहत व शिवशंकर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संयुक्त शैक्षणिक सहल उदगीर येथील ऐतिहासिक किल्ला, प्रियदर्शिनी (विकास) साखर कारखाना, साईधाम तोंडार पाटी पर्यटन स्थळास शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. प्रथम उदगीर येथील ऐतिहासिक किल्ला पाहण्यात आला. उदागीर बाबा महाराजांचा समाधी स्थळास पुजा आरती करून देवदर्शन घेण्यात आले. तद्नंतर संपूर्ण किल्ला पाहण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या किल्ल्याची संपूर्ण माहिती [उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी' असे होते. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 'उदकगिरी' नावाने करण्यात आला आहे. उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात. त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्‍त्‍व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी 1760 मध्ये निजामाविरुद्ध उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत उदगीरचा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्याकाळचे काही अवशेष आजही पाहता येतात. उदगीरच्या किल्ल्याचा उल्लेख अकराव्या शतकातील शिलालेखांसोबत पुराण कथांमध्येही आढळतो. 'करबसवेश्वर ग्रंथ' या पोथीतील कथेनुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींना 'मी या ठिकाणी लिंग रुपाने प्रगट होईन' असा आशिर्वाद दिला. त्या ठिकाणी जमिनीतून एक लिंग हळुहळू वर आले. पुढील काळात त्या ठिकाणी वस्ती वाढली. नगर वसले. त्यास उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबा महाराजांचा मठ व शिवलिंग आहे. ऐतिहासिक किल्ला पाहणीनंतर साईधाम तोंडार पाटी येथील पर्यटन स्थळास प्रथम साईबाबा मंदिर देवदर्शन करून संपूर्ण गार्डन मध्ये विविध खेळ उपकरणे यांचा विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी जेवण झाल्यावर प्रियदर्शिनी (विकास) साखर कारखाना येथील स्थळास भेट दिली. सर्व विद्यार्थ्यांना साखर कशी तयार होते या विषयी व विविध यंत्र दाखवून माहिती दिली. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, मदन बिरादार, तानाजी गेंदेवाड, सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, अर्चना गायकवाड,सूनंदा गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, कलावती मेहत्रे, रियाजोदीन सय्यद,लहू गोंदेगावे आदी जन शैक्षणिक सहलीसाठी उपस्थित होते.शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहल बदल खुप आनंदायी , उत्साह,व मज्जा आली व खुप काही माहिती मिळाली असे बोलून दाखवले.

रावणगाव नविन वसाहत व शिवशंकर नगर   जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उदगीर किल्ला, साखर कारखाना व साईधाम पर्यटन स्थळास  भेट.




उदगीर वार्ता....... रावणगाव नविन वसाहत व शिवशंकर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संयुक्त शैक्षणिक सहल उदगीर येथील ऐतिहासिक किल्ला, प्रियदर्शिनी (विकास) साखर कारखाना, साईधाम तोंडार पाटी पर्यटन स्थळास  शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.  प्रथम उदगीर येथील ऐतिहासिक किल्ला पाहण्यात आला. उदागीर बाबा महाराजांचा समाधी स्थळास पुजा आरती करून देवदर्शन घेण्यात आले. तद्नंतर संपूर्ण किल्ला पाहण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या किल्ल्याची संपूर्ण माहिती [उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी' असे होते. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 'उदकगिरी' नावाने करण्यात आला आहे. उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात. त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्‍त्‍व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी 1760 मध्ये निजामाविरुद्ध उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत उदगीरचा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्याकाळचे काही अवशेष आजही पाहता येतात. उदगीरच्या किल्ल्याचा उल्लेख अकराव्या शतकातील शिलालेखांसोबत पुराण कथांमध्येही आढळतो. 'करबसवेश्वर ग्रंथ' या पोथीतील कथेनुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींना 'मी या ठिकाणी लिंग रुपाने प्रगट होईन' असा आशिर्वाद दिला. त्या ठिकाणी जमिनीतून एक लिंग हळुहळू वर आले. पुढील काळात त्या ठिकाणी वस्ती वाढली. नगर वसले. त्यास उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबा महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.

ऐतिहासिक किल्ला पाहणीनंतर साईधाम तोंडार पाटी येथील पर्यटन स्थळास प्रथम साईबाबा मंदिर देवदर्शन करून संपूर्ण गार्डन मध्ये विविध खेळ उपकरणे यांचा विद्यार्थ्यांनी  खूप आनंद घेतला. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी जेवण झाल्यावर प्रियदर्शिनी (विकास) साखर कारखाना येथील स्थळास भेट दिली. सर्व विद्यार्थ्यांना साखर कशी तयार होते या विषयी व विविध यंत्र दाखवून माहिती दिली. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, मदन बिरादार, तानाजी गेंदेवाड, सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, अर्चना गायकवाड,सूनंदा गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, कलावती मेहत्रे, रियाजोदीन सय्यद,लहू गोंदेगावे  आदी जन शैक्षणिक सहलीसाठी उपस्थित होते.शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहल बदल खुप आनंदायी , उत्साह,व मज्जा आली व खुप काही माहिती मिळाली असे बोलून दाखवले.

Wednesday, March 13, 2019

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक बातमी

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा. उदगीर वार्ता......... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी ते शिक्षक या पदाविषयी लिखीत स्वरुपात त्यांचे कार्य लिहून देण्यात आले. या प्रमाणे सय्यद जिशान- शिक्षणाधिकारी, सय्यद तैरीम- गटशिक्षणाधिकारी, गायकवाड रोहित- शिक्षण विस्तार अधिकारी, सय्यद अमन- केंद्र प्रमुख, गायकवाड प्रांजली- मुख्याध्यापक, शेख इस्माईल- शिक्षक,, सय्यद नेहा,- शिक्षिका, शेख महेबुब- शिक्षक, मनियार सिमरन- शिक्षिका.या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदा विषयी सविस्तर लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. या प्रमाणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तासीका प्रमाणे विद्यार्थ्यांना आनंदी, उत्साहाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना खूप मज्जा आली असे बोलून दाखविले. तद्नंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर स्वंयशासन दिन साजरा केला बद्दल अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनीं गायकवाड प्रांजली व आभारप्रदर्शन सय्यद तैरीम यांनी मानले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, आदी जण उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा.




उदगीर वार्ता......... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी ते शिक्षक या पदाविषयी लिखीत स्वरुपात त्यांचे कार्य लिहून देण्यात आले. या प्रमाणे सय्यद जिशान- शिक्षणाधिकारी, सय्यद तैरीम- गटशिक्षणाधिकारी, गायकवाड रोहित- शिक्षण विस्तार अधिकारी, सय्यद अमन- केंद्र प्रमुख, गायकवाड प्रांजली- मुख्याध्यापक, शेख इस्माईल- शिक्षक,, सय्यद नेहा,- शिक्षिका, शेख महेबुब- शिक्षक, मनियार सिमरन- शिक्षिका.या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदा विषयी सविस्तर लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. या प्रमाणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तासीका प्रमाणे विद्यार्थ्यांना आनंदी, उत्साहाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना खूप मज्जा आली असे बोलून दाखविले. तद्नंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर स्वंयशासन दिन साजरा केला बद्दल अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनीं गायकवाड प्रांजली व आभारप्रदर्शन सय्यद तैरीम यांनी मानले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, आदी जण उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा. उदगीर वार्ता...... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उपक्रमा अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थी यांना शाळेत बोलावून त्यांचा सन्मान पुर्वक वाजत गाजत हार, फुगे, आनंददायी टोपी चालून गावात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.तद्नंतर शाळेच्या परीपाठानंतर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, कलावती मेहत्रे, वंदना साळवेकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठी,गणित विषयासातील गमती जमती, गोष्ट, गाणी, बडबड गीते शाळेतील प्रोजेक्टर व होमथेटर वर दाखविण्यात आले. सर्व विद्यार्थी आनंदी,खुश दिसून आले. विद्यार्थी रममान झाले. या नंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात येण्यासाठी हार्दिक देण्यात आल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, कलावती मेहत्रे,वंदना साळवेकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा.



उदगीर वार्ता...... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उपक्रमा अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थी यांना शाळेत बोलावून त्यांचा सन्मान पुर्वक वाजत गाजत हार, फुगे, आनंददायी टोपी चालून गावात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.तद्नंतर शाळेच्या परीपाठानंतर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, कलावती मेहत्रे, वंदना साळवेकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठी,गणित विषयासातील गमती जमती, गोष्ट, गाणी, बडबड गीते शाळेतील प्रोजेक्टर व होमथेटर वर दाखविण्यात आले. सर्व विद्यार्थी आनंदी,खुश दिसून आले. विद्यार्थी रममान झाले. या नंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात येण्यासाठी हार्दिक देण्यात आल्या. 

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, कलावती मेहत्रे,वंदना साळवेकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

रावणगावात राष्ट्रीय मतदार यादीत नावनोंदणी विशेष मोहीम आयोजित. उदगीर प्रतिनिधी.......आज दिनांक 1/3/2019 रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मौजे रावणगाव येथे स्त्री, पुरुष वय 18 व त्या पुढील मतदार नागरिक यांना राष्ट्रीय मतदार यादीत नाव नोंदणी साठी दिनांक 2 व 3 मार्च 2019 विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे तरी गावातील जास्तीत जास्त नव मतदारांनी लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन करण्यात आले. दिनांक 2/3/5019 व 3/3/2019 रोजी फार्म नंबर 6 नावनोंदणी. फार्म नं.7,8, 8A स्विकारण्यात येणार आहे असे सांगितले

रावणगावात  राष्ट्रीय मतदार यादीत नावनोंदणी विशेष मोहीम आयोजित.


उदगीर प्रतिनिधी.......आज दिनांक 1/3/2019 रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मौजे रावणगाव येथे स्त्री, पुरुष वय 18 व त्या पुढील  मतदार नागरिक यांना राष्ट्रीय मतदार यादीत नाव नोंदणी साठी दिनांक 2 व 3 मार्च 2019 विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे तरी गावातील जास्तीत जास्त नव मतदारांनी लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन करण्यात आले.  दिनांक 2/3/5019 व 3/3/2019 रोजी फार्म नंबर 6 नावनोंदणी. फार्म नं.7,8, 8A स्विकारण्यात येणार आहे असे सांगितले

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओळख पत्र वाटप. उदगीर प्रतिनिधी.......‌आज दिनांक 28/2/2019 रोजी रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक व स्वयंपाकी यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेची शिस्त,एकता व ओळख सर्वांना दिसून यावी म्हणून 100 टक्के विद्यार्थी.शिक्षक व स्वंयपाकी यांना ओळख पत्र बनवून घेतले व दिनांक 28/2/2019 रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना ओळख पत्र वाटप करण्यात आले . मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना ओळख पत्र नियमितपणे वापरावे असे सांगितले या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल.उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड. शिक्षीका सुनिता पोलावार. कलावती मेहत्रे व सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओळख पत्र वाटप.


उदगीर प्रतिनिधी.......‌आज दिनांक 28/2/2019 रोजी रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक व स्वयंपाकी यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेची शिस्त,एकता व ओळख सर्वांना  दिसून यावी म्हणून 100 टक्के विद्यार्थी.शिक्षक व स्वंयपाकी यांना ओळख पत्र बनवून घेतले व दिनांक 28/2/2019 रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना ओळख पत्र वाटप करण्यात आले .

मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना ओळख पत्र नियमितपणे वापरावे असे सांगितले या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल.उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड. शिक्षीका सुनिता पोलावार. कलावती मेहत्रे व सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर वार्ता....... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पहिल्यांदाच ऑनलाईन माहिती च्या द्वारे सन 2019 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार उदगीर तालुक्यातील रा्वणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती वतीने दिनांक 23/2/2019 रोजी सरस्वती भुवन औरंगपुरा औरंगाबाद येथे मा.ना. हरीभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या वेळी डॉ भागवत कराड अध्यक्ष मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, गिरीश बोराळकर भाजपा प्रवक्ते, गोविंद केंद्रे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार, संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे, राज्याध्यक्ष अंकुश काळे, महेश तांदळे राजाध्यक्ष माध्यमिक शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचे मित्र परिवार कडून अभिनंदन करत आहे.

मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


उदगीर वार्ता....... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पहिल्यांदाच ऑनलाईन माहिती च्या द्वारे सन 2019 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार उदगीर तालुक्यातील रा्वणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती वतीने दिनांक 23/2/2019 रोजी सरस्वती भुवन औरंगपुरा औरंगाबाद येथे मा.ना. हरीभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या वेळी डॉ भागवत कराड अध्यक्ष मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, गिरीश बोराळकर भाजपा प्रवक्ते, गोविंद केंद्रे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार, संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे, राज्याध्यक्ष अंकुश काळे, महेश तांदळे राजाध्यक्ष माध्यमिक शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचे मित्र परिवार कडून अभिनंदन करत आहे.

आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पुरस्कारासाठी आवाहन *राज्यातील अतिशय उत्कृष्ठ आणि निःपक्षपाती पुरस्कार साठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अनेक आदर्श कार्य असणाऱ्या राज्य, देश पातळीवरील उत्कृष्ठ कार्य केलेल्या मान्यवर शिक्षक, अधिकारी मंडळींनी केलेल्या विनंतीला मान देऊन "प्रस्ताव भरण्याची मुदतीत वाढ" देण्याचा निर्णय आदर्श शिक्षक समिती घेतला आहे.* 🔊 *आदर्श पुरस्कार 2019* 🔊 ⏲ *प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत दि.15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढ देण्यात येते परंतु या नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.* *महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आयोजित औरंगाबाद येथील त्रैवार्षिक अधिवेशन निमित्ताने राज्यातील आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श अधिकारी ह्या प्रवर्गातून ऑनलाइन पध्दतीने राज्यातील पहिला प्रयोग मांडत संघटनेने आदर्श असे कार्य असणारे प्रस्ताव मागवले ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.* *तसेच काही शिक्षकांच्या मागणीस्तव व आदर्श कार्य असणाऱ्या शिक्षक आणि शाळांच्या आग्रहास्तव सदरील लिंकवर प्रस्ताव भरण्याची मुदत दि. 15 फेब्रुवारी 2019 च्या रात्री 11:59 पर्यंत वाढवण्यात येत आहे.* 💡 _*जिप/नपा/मनपा/खाजगी/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ज्युनियर/सिनियर शिक्षक /शिक्षिकासाठी प्रस्ताव लिंक खालील प्रमाणे.*_ https://bit.ly/2MPoGZX 💡 _*आदर्श केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक साठी प्रस्ताव लिंक*_ https://bit.ly/2DPXBTz 💡 _*आदर्श शाळा जि प/नपा/मनपा साठी प्रस्ताव लिंक*_ https://bit.ly/2UEfQAX 📌 *वरील सर्व लिंक ह्या आदर्श पुरस्कार प्रस्तावासाठी मुदत वाढवून देण्याचे कारण सामान्य शिक्षक यांना ही पद्धत खूप आवडली आहे व त्यांच्या आणखी इतरांचे काही प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांच्या आग्रहास्तव राज्य निवड समितीने मुदत वाढवून दि.15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढ दिलेली आहे.* 📌 *तरी आपण आपल्या स्थानिक ग्रुपवर व चांगले आदर्श कार्य करणारे मग ते कोणत्याही गटातटाचे किंवा संघटनेचे असोत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक समिती पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे त्यांचा गौरव करेल.* प्रस्ताव ऑनलाइन सादर करताना काही अडचण आल्यास संपर्क करा. 📞 *7588020886* 📞 *8805625211* 📞 *9763434383* यानंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी *अध्यक्ष* *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* *आदर्श पुरस्कार समिती* *महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती.* ♻♻♻♻♻♻♻♻♻♻

आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पुरस्कारासाठी आवाहन


       

       *राज्यातील अतिशय उत्कृष्ठ आणि निःपक्षपाती पुरस्कार साठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अनेक आदर्श कार्य असणाऱ्या राज्य, देश पातळीवरील उत्कृष्ठ कार्य केलेल्या मान्यवर शिक्षक, अधिकारी मंडळींनी केलेल्या विनंतीला मान देऊन "प्रस्ताव भरण्याची मुदतीत वाढ" देण्याचा निर्णय आदर्श शिक्षक समिती घेतला आहे.*


 🔊  *आदर्श पुरस्कार 2019* 🔊

      ⏲ *प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत दि.15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढ देण्यात येते परंतु या नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.* 

      

         *महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आयोजित औरंगाबाद येथील त्रैवार्षिक अधिवेशन निमित्ताने राज्यातील आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श अधिकारी ह्या प्रवर्गातून ऑनलाइन पध्दतीने राज्यातील पहिला प्रयोग मांडत संघटनेने आदर्श असे कार्य असणारे प्रस्ताव मागवले ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.*

        *तसेच काही शिक्षकांच्या मागणीस्तव व आदर्श कार्य असणाऱ्या शिक्षक आणि शाळांच्या आग्रहास्तव सदरील लिंकवर प्रस्ताव भरण्याची मुदत दि. 15  फेब्रुवारी 2019 च्या रात्री 11:59 पर्यंत वाढवण्यात येत आहे.*

   💡  _*जिप/नपा/मनपा/खाजगी/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ज्युनियर/सिनियर शिक्षक /शिक्षिकासाठी प्रस्ताव लिंक खालील प्रमाणे.*_

     

https://bit.ly/2MPoGZX



  💡   _*आदर्श केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक साठी प्रस्ताव लिंक*_



https://bit.ly/2DPXBTz



   💡   _*आदर्श शाळा जि प/नपा/मनपा साठी प्रस्ताव लिंक*_

    

https://bit.ly/2UEfQAX



   📌    *वरील सर्व लिंक ह्या आदर्श पुरस्कार प्रस्तावासाठी मुदत वाढवून देण्याचे कारण सामान्य शिक्षक यांना ही पद्धत खूप आवडली आहे व त्यांच्या आणखी इतरांचे काही प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांच्या आग्रहास्तव राज्य निवड समितीने मुदत वाढवून दि.15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढ दिलेली आहे.*

     📌   *तरी आपण आपल्या स्थानिक ग्रुपवर व चांगले आदर्श कार्य करणारे मग ते कोणत्याही गटातटाचे किंवा संघटनेचे असोत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक समिती पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे त्यांचा गौरव करेल.*

     प्रस्ताव ऑनलाइन सादर करताना काही अडचण आल्यास संपर्क करा.

    📞  *7588020886*

    📞  *8805625211*

   📞   *9763434383*


   यानंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी

  

          *अध्यक्ष*

*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*


*आदर्श पुरस्कार समिती*

 *महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती.*

♻♻♻♻♻♻♻♻♻♻

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती ची उदगीर,देवणी, जळकोट कार्यकारणी जाहीर उदगीर वार्ता..... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती ची उदगीर, देवणी, जळकोट कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उदगीर येथे शिक्षक पतपेढी सभागृहात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चा लातुर जिल्हा मेळावा उदगीर ,देवणी,जळकोट,शिरुर अनंतपाळ तालूका कार्यकारणी निवड सभा आणि जिल्ह्य़ातील सर्व तालूके नियुक्ती पत्रे देणे, सत्कार, जिल्हा शाखा विस्तार, राज्य अधिवेशन तयारी व संघटनेची पुढील दिशा ठरवणेसाठी नियोजीत कार्यक्र दिनांक 02 /02/ 2019 रोजी (वार शनिवार)रोजी जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,उदगीर जिल्हा लातुर येथे ठीक 1:00 वाजता आयोजित करण्यात आला.आदरणीय मान्यवरांच्याउपस्थितीत मा.दिनकरराव के़ंदे सेवा निवृत्त मुख्याध्यापक तथा माजी चेअरमन शिक्षक पेतपेढी मा.मारोती ला़ंडगे मूख्याध्यापक मा.श्री .माधवराव लातूरे राज्य महासचिवआदर्श शिक्षक समिती महाराष्ट्र मा. श्री. रामकिशन लटपटे राज्य कार्यालयीन चिटणीस मा.श्री. महेश तांदळे माध्यमिक विभाग राज्य प्रमुख -आदर्श शिक्षक समिती मा.श्री.चंदू घोडके जिल्हाध्यक्ष,आदर्श शिक्षक समिती लातूर मा.श्री.वाल्मीक पंदे जिल्हा सरचिटणीस,आदर्श शिक्षक समिती लातूर मा.श्री.बि.एन.चामले कार्याध्यक्ष,आदर्श शिक्षक समिती लातूर मा.श्री.सूर्यकांत बोईनवाड जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर मा.श्री गंगाधर बिरादार जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री डि.के. देवकते मा.श्री.सुधाकर केंद्रे आदर्श शिक्षक समिती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर केली. उदगीर तालुक्यातील कार्यकारणी सदस्य श्री ज्ञानेश्वर बडगे अध्यक्ष, श्री लक्ष्मण रोडगे उपाध्यक्ष,श्री मदन बिरादार सरचिटणीस,श्री अकबर शेख कोष्याध्यक्ष,श्री रमेश ख़ंडोमलके संपर्क प्रमुख,श्री प्रदीप तळेगावकर प्रसिद्धि प्रमुख,वंगरवाड सर सल्लागार, श्री मारोती लांडगे तालूका नेते, श्री गादगे सर मार्गदर्शक,श्री गोपाळ निंडवचे तालुका संघटक,श्री शिवलिंग मार्गपवार तालुका संघटक, श्री अनंत रेकुळवाड तालुका संघटक,श्री सोमाशे सर तालुका संघटक आदी पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून निवड पत्र देण्यात आले व सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक राजाध्यक्ष महेश तांदळे व आभारप्रदर्शन वाल्मिक पंदे जिल्हा सरचिटणीस यांनी मानले

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती ची उदगीर,देवणी, जळकोट कार्यकारणी जाहीर 


उदगीर वार्ता..... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती ची उदगीर, देवणी, जळकोट कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उदगीर येथे शिक्षक पतपेढी सभागृहात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक

 समिती चा  लातुर  जिल्हा मेळावा उदगीर ,देवणी,जळकोट,शिरुर अनंतपाळ  तालूका  कार्यकारणी  निवड सभा आणि जिल्ह्य़ातील सर्व तालूके नियुक्ती पत्रे देणे, सत्कार, जिल्हा शाखा विस्तार, राज्य अधिवेशन तयारी व संघटनेची पुढील दिशा ठरवणेसाठी नियोजीत कार्यक्र दिनांक 02 /02/ 2019 रोजी (वार शनिवार)रोजी जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,उदगीर  जिल्हा लातुर येथे ठीक 1:00 वाजता आयोजित करण्यात आला.आदरणीय मान्यवरांच्याउपस्थितीत मा.दिनकरराव के़ंदे सेवा निवृत्त मुख्याध्यापक तथा माजी चेअरमन शिक्षक पेतपेढी मा.मारोती ला़ंडगे मूख्याध्यापक मा.श्री .माधवराव लातूरे  राज्य महासचिवआदर्श शिक्षक समिती महाराष्ट्र मा. श्री. रामकिशन लटपटे

राज्य कार्यालयीन चिटणीस मा.श्री. महेश तांदळे माध्यमिक विभाग राज्य प्रमुख -आदर्श शिक्षक  समिती मा.श्री.चंदू घोडके जिल्हाध्यक्ष,आदर्श शिक्षक समिती लातूर        

मा.श्री.वाल्मीक पंदे जिल्हा सरचिटणीस,आदर्श शिक्षक  समिती लातूर मा.श्री.बि.एन.चामले कार्याध्यक्ष,आदर्श शिक्षक समिती लातूर मा.श्री.सूर्यकांत बोईनवाड

 जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर मा.श्री गंगाधर बिरादार

जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री डि.के. देवकते

मा.श्री.सुधाकर केंद्रे आदर्श शिक्षक समिती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर केली.

  उदगीर तालुक्यातील कार्यकारणी सदस्य

श्री ज्ञानेश्वर बडगे अध्यक्ष, श्री लक्ष्मण रोडगे उपाध्यक्ष,श्री मदन बिरादार सरचिटणीस,श्री अकबर शेख कोष्याध्यक्ष,श्री रमेश ख़ंडोमलके संपर्क प्रमुख,श्री प्रदीप तळेगावकर प्रसिद्धि प्रमुख,वंगरवाड सर सल्लागार,  श्री मारोती लांडगे तालूका नेते, श्री गादगे सर मार्गदर्शक,श्री गोपाळ निंडवचे तालुका संघटक,श्री शिवलिंग मार्गपवार तालुका संघटक, श्री अनंत रेकुळवाड तालुका संघटक,श्री सोमाशे सर तालुका संघटक आदी पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून निवड पत्र देण्यात आले व सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक राजाध्यक्ष महेश तांदळे व आभारप्रदर्शन वाल्मिक पंदे   जिल्हा सरचिटणीस यांनी मानले

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे परीक्षा पे चर्चा संवाद विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. उदगीर वार्ता..... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 29/1/2019 रोजी भारताचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी जी खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी दुरदर्शन राष्ट्रीय चॅनल थेट प्रक्षेपण सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. तरी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठानंतर सर्व विद्यार्थ्यांना या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांना हा संवाद शाळेंत सर्व विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर दाखवण्यात आला. हा संवाद विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने ऐकून घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा 2.0' कार्यक्रम देशात आणि परदेशात विद्यार्थी परीक्षा संबंधित अनेक पैलू संवाद. दरम्यान, या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि भारताबाहेरील विद्यार्थी कोणत्याही संभाषण. तो बाहेर निदर्शनास की बोर्ड परीक्षा नाही जीवन आणि ध्येय नेहमी प्रचंड आहे. या वेळी, पंतप्रधान मोदीजी यांनी, ताण, परीक्षा , दबाव वेदनारहित परीक्षा, यासह अनेक विषयांवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना दिशा दिली. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी. शिक्षिका सुनिता पोलावार व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे उपस्थित होते

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे परीक्षा पे चर्चा संवाद विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.


उदगीर वार्ता..... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 29/1/2019  रोजी भारताचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी जी खास विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी दुरदर्शन राष्ट्रीय चॅनल थेट प्रक्षेपण सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. तरी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठानंतर सर्व विद्यार्थ्यांना या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांना हा संवाद शाळेंत सर्व विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर दाखवण्यात आला. हा संवाद विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने ऐकून घेतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा 2.0' कार्यक्रम देशात आणि परदेशात विद्यार्थी परीक्षा संबंधित अनेक पैलू संवाद. दरम्यान, या वेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि भारताबाहेरील विद्यार्थी कोणत्याही संभाषण. तो बाहेर निदर्शनास की बोर्ड परीक्षा नाही जीवन आणि ध्येय नेहमी प्रचंड आहे. या वेळी, पंतप्रधान मोदीजी यांनी, ताण,  परीक्षा , दबाव वेदनारहित परीक्षा, यासह अनेक विषयांवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना दिशा दिली. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी. शिक्षिका सुनिता पोलावार व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे उपस्थित होते

प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा.


उदगीर वार्ता....... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 26/1/2019 रोजी 70 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना घेऊन गावात देशभक्ती गीत व विविध घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. तद्नंतर शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरीक यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रजासत्ताक दिना साठी उपस्थित असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अकबर पटेल अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,श्री मष्णाजी गायकवाड उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री शिवराज बिरगे माजी चेअरमन,  श्री कोयले गुरूजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक,श्री डोणगापुरे मामा,श्री माधवराव पाटील,श्री अलीम सय्यद,श्री ईस्माईल पटेल,श्री कारभारी मामा आदी जणांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.तद्नंतर श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रजासत्ताक दिना विषयावर सविस्तर माहिती दिली व शाळेतील शैक्षणिक प्रगती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत विविध नेत्यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली.या मध्ये सुविधा गायकवाड, यशवंत गायकवाड इयत्ता पहिली, आशा कांबळे, प्रांजली गायकवाड, इयत्ता तिसरी, तैरीम सय्यद, जिशान सय्यद, रोहित गायकवाड इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे सादर केली. तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त देशभक्ती गीत सादरीकरण करण्यात आले. गीत सादरीकरणा नंतर प्रजासत्ताक दिना निमित्त विविध पंधरा खेळाचे आयोजन करण्यात आले होते या खेळात इयत्ता निहाय पहिला, दुसरा क्रमांक वैयक्तिक व सा़ंघिक विजेता स्पर्धकांना शैक्षणिक साहित्य वही, पेन, कंपास,स्केल,ऱंगीत काडी,स्केच पेन, उजळणी पुस्तक, आदी वस्तू उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनिता पोलावार व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती साठी हा उपक्रम साजरा. उदगीर वार्ता........ राववणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 4/2/2019 रोजी 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिना निमित्त शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक कर्करोग दिन आहे,आपली शाळा तंबाखू मुक्त आहे व आपले पालक सुध्दा व्यसनमुक्त झाले पाहिजे असे सांगितले व आपणं सर्वांनी आपल्या पालकांना एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबवून व्ससन मुक्ती चा संदेश देऊन गाव व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करू असे सांगितले व एक पत्र व्यसनमुक्ती साठी चा संदेश प्रत्यक्ष पोष्ट कार्ड वर विद्यार्थ्यांना स्वत लिहण्यास सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व हस्ताक्षरात एक पत्र व्यसनमुक्ती चा संदेश लिहून पालकांना दिले. *प्रिय बाबा,* *बऱ्याच दिवसापासून मी पाहत आहे की तुमची तब्येत आता पूर्वी सारखी राहिली नाही.* *तुमचे वजन कमी होत आहे, थकवा येतो आणि भूकही लागत नाही.* आमच्या शाळेत आम्ही तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबवीत आहोत.* *आम्ही विद्यार्थ्यांनी तर पक्क ठरविले आहे की आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही.* *आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन असल्याने आमच्या शाळेत एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा उपक्रम आम्ही विद्यार्थी राबवीत आहोत.* *मीही तुम्हाला एक पत्र लिहीत आहे. तुम्हीही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपले व्यसन सोडा. तुमची तब्येत चांगली राहिली तर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल* बाबा, तुम्ही मला आज वचन द्या की आजन्म व्यसनमुक्त राहणार... मीही पुढील पाच महिने तुमचा पाठपुरावा करणार आहे. तुमचा मुलगा/मुलगी *xxxxxxxxxx* असा व्यसनमुक्ती चा संदेश देऊन एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,शिक्षीका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल,खमर सय्यद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती साठी हा उपक्रम साजरा.


उदगीर वार्ता........ राववणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 4/2/2019 रोजी 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिना निमित्त शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक कर्करोग दिन आहे,आपली शाळा तंबाखू मुक्त आहे व आपले पालक सुध्दा व्यसनमुक्त झाले पाहिजे असे सांगितले व आपणं सर्वांनी आपल्या पालकांना एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबवून व्ससन मुक्ती चा संदेश देऊन गाव व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करू असे सांगितले व एक पत्र व्यसनमुक्ती साठी चा संदेश प्रत्यक्ष पोष्ट कार्ड वर विद्यार्थ्यांना स्वत लिहण्यास सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व हस्ताक्षरात एक पत्र व्यसनमुक्ती चा संदेश लिहून पालकांना दिले.

*प्रिय बाबा,*

*बऱ्याच दिवसापासून मी पाहत आहे की तुमची तब्येत आता पूर्वी सारखी राहिली नाही.*

*तुमचे वजन कमी होत आहे, थकवा येतो आणि भूकही लागत नाही.*

आमच्या शाळेत आम्ही तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबवीत आहोत.*

*आम्ही विद्यार्थ्यांनी तर पक्क ठरविले आहे की आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही.*

*आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन असल्याने आमच्या शाळेत एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा उपक्रम आम्ही विद्यार्थी राबवीत आहोत.*

*मीही तुम्हाला एक पत्र लिहीत आहे. तुम्हीही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपले व्यसन सोडा. तुमची तब्येत चांगली राहिली तर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल*

बाबा, तुम्ही मला आज वचन द्या की आजन्म व्यसनमुक्त राहणार... मीही पुढील पाच महिने तुमचा पाठपुरावा करणार आहे.


तुमचा मुलगा/मुलगी

*xxxxxxxxxx*


असा व्यसनमुक्ती चा संदेश देऊन एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,शिक्षीका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल,खमर सय्यद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते