" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार

श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार 


   



बोळेगाव बु -- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांची बदली झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु शाळेत शोशल डिष्टंश नियमांचे पालन करुन येथे मोठ्या उत्साहात  श्री ज्ञानेश्वर यांची  बदली झाल्यामुळे आज दिनांक 26/2/2021रोजी शाळेच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे , प्रमुख पाहुणे  निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे तसेच शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती मजलसा पुठठेवाड व श्रीमती आशा मुळे उपस्थित होते.  मान्यवरांच्या उपस्थितीत  श्री ज्ञानेश्वर बडगे यांचा मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे  व मान्यवरांच्या उपस्थितीत  शाल श्रीफळ भर पेहराव व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
 निरोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक
श्री माधवराव पारशेटटे यांनी श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या विषयी  मनोगत व्यक्त केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या तदनंतर निरोप मुर्ती श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी निरोप प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शाळेत गेल्या 2 वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य, शाळेची शैक्षणिक प्रगती , राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शाळेला व वैयक्तिक मिळालेल्या सन्मान, पुरस्कार या विषयी मनोगत व्यक्त केले. माझ्या स्वपनातील अतिशय सुंदर शाळा पहायला मिळाली. ही शाळा उपक्रमशील करण्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. हि शाळा माझ्या आठवणीत आयुष्यभर राहील. असे मनोमन व्यक्त केले.
 या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे  व आभार शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी.शिक्षक व पालक उपस्थित होते.


















No comments:

Post a Comment

गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख साहेब यांची PAT परीक्षेच्या निमित्ताने शाळा भेट

गटशिक्षणाधिकारी मा. शफी शेख साहेब यांची PAT परीक्षेच्या निमित्ताने शाळा भेट*  ------------------------------------ *तिवटग्याळ - दिनांक 13 आक...