तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची पूण्यतिथी साजरी
तिवटग्याळ - आज दिनांक 28/11/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे परीपाठानंतर 28 नोव्हेंबर हा दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यतिथी दिन असल्याने. पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली . या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment