" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा शुभारंभ निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा शुभारंभ निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा*

*उदगीर ...... तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  आज दिनांक 15/6 /2023 रोजी शाळा शुभारंभ निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमा अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थी यांना शाळेत बोलावून त्यांचा सन्मान पुर्वक वाजत गाजत हार, फुगे, आनंददायी गीत व विविध शैक्षणिक घोषणा देत गावात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.तद्नंतर शाळेच्या परीपाठानंतर  पर्यवेक्षीय अधिकारी साधन व्यक्ती गोविंद भोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, गीता कच्छवे, नंदिनी नरहरे व अन्य जणांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद्नंतर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत साधन व्यक्ती मा. गोविंद भोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, मनिषा श्रीमंगले, गीता कच्छवे, नंदिनी नरहरे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ जिलेबी वाटप करण्यात आली. तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठी,गणित विषयासातील गमती जमती, गोष्ट, गाणी, बडबड गीते म्हणून दाखवले . सर्व विद्यार्थी आनंदी,खुश दिसून आले. विद्यार्थी रममान झाले. या नंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात येण्यासाठी हार्दिक देण्यात आल्या. तद्नंतर भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव या प्रमाणे साधन व्यक्ती गोविंद भोळे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी केले  यांनी केले. तदनंतर उपस्थित साधन व्यक्ती गोविंद भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व मान्यवर यांच्या हस्ते मोफत पाठय़पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले.  उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शैक्षणिक वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी साधन व्यक्ती गोविंद भोळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली, उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, मनिषा श्रीमंगले, गीता कच्छवे, नंदिनी नरहरे शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रवेशोत्सव कार्यमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*































































No comments:

Post a Comment