" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश आपल्या दारी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश आपल्या दारी* 

*तिवटग्याळ -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 14/6 /2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळा व्यवस्थापन समिती च्या सर्व सद्स्यांना पुर्व सुचना देऊन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व सद्स्यांना सन 2023 -2024 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच शाळा पुर्व तयारी, विद्यार्थी प्रवेश नियोजन, आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण, वृक्षारोपण या विषयी सविस्तर माहिती दिली. तद्नंतर इयत्ता पहिली प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेश आपल्या दारी अंतर्गत 100 % प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज भरून घेण्यात आला. प्रवेश पात्र नवागत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन सन 2023 - 2024 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात दिनांक 15/6/2023 रोजी करण्यात येणार आहे तसेच या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष, पाठ्यपुस्तक, शालेय पोषण आहार अंतर्गत गोड पदार्थ दिला जाणार आहे असे सर्व विद्यार्थी व पालकांना सांगण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रमेश साळुंके  व अन्य जण उपस्थित होते*











No comments:

Post a Comment