Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 16, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दहीहंडीचा उत्सव आयोजित
















































तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दहीहंडीचा उत्सव आयोजित*

*तिवटग्याळ - आज दि.7-9-2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या च्या वतीने आज दिनांक 7/9/2023 रोजी घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जणांच्या पुढाकाराने शाळेतील सर्व विद्यार्थी गोविंदा गीते  व वेशभूषेत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व  यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाची माहिती सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात बरेचशे सण साजरे केले जातात, त्यातलाच एक सण म्हणजे दही हंडी, बाकीचे सण जेवढ्या आनंदात साजरे केले जाते तेवढ्याच आनंदात दही हंडीच्या सणाला सुद्धा साजरे केल्या जातं, दही हंडीला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरे केल्या जाते, तसेच भारतात इस्कॉन संस्थेच्या द्वारे सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केल्या जातो अशी सविस्तर माहिती सांगितली. चला तर आपण दही हंडी हा खेळ उत्सव साजरा करुया शाळेतील विद्यार्थ्यांना गोविंदा ला घेऊन शाळेतील विद्यार्थी इंद्रजीत कच्छवे व आशीष बिरादार या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. शाळेतील विद्यार्थी गोविंदा झाल्याने अतिशय सुंदर व मनमोहक रिंगण करून दहीहंडी साजरी केली. विद्यार्थ्याच्या आनंदात सर्व जण सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी खूपच उत्स्फूर्त पणे गोविंदा गीते सादर केली. या दहिहंडी उत्सवासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार,शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी परीश्रम घेतले*

No comments:

Post a Comment