तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिवस उत्साहाने साजरा*
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 11/9/2023 रोजी आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्रथम शालेय परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुर्व सुचना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना बोलावण्यात आले. प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा. माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, देविदास तवर, बापूराव येणगे, कौशल्याबाई येणगे, सिमिंताबाई कांबळे, भागाबाई बिरादार, भिवराबाई येलमटे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थितांना आज 10 सप्टेंबर या दिवशी या वर्षापासून राज्यात आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. आपल्या जीवनामध्ये आजी-आजोबांचे महत्त्व या निमित्ताने मुलांच्या मनावर ठसले जावे असा मुख्य उद्देश याचा आहे.
आपण दरवर्षी योग दिन, पितृदिन, मातृदिन, बालिका दिन, विज्ञान दिन, मातृभाषा दिन, पर्यावरण दिन, बाल दिन, संविधान दिन अशा प्रकारचे विविध दिनविशेष साजरे करत असतो.प्रत्येक दिनामागे काही चांगले उद्देश असतात. त्याचप्रमाणे या वर्षापासून सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी आजी आजोबा दिन साजरा केला जात आहे. सध्याच्या शहरीकरणामुळे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना पूर्वीप्रमाणे मिळत नाही. मुलांचा मायेने सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांची माया – ममता मुलांना संस्कारित होण्यास फायदेशीर ठरते हे या निमित्ताने आपल्याला आधुनिक युगातील मुलांना दाखवून द्यायचे आहे. मुलांची जडणघडण होत असताना आजी आजोबांचे प्रेम मिळणे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची आवश्यकता असते. हा आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.या वर्षीचा आजी आजोबा शाळेने स्वतः निर्णय घेऊन वर्षातील एक दिवस आजी आजोबा दिवस साजरा करण्यात यावे असे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी व्यक्त केले. तदनंतर शाळेतील शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी आजी आजोबा यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तद्नंतर विद्यार्थ्यांचे आजी आजोबा माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, देविदास तवर, बापूराव येणगे, कौशल्याबाई येणगे, सिमिंताबाई कांबळे, भागाबाई बिरादार, भिवराबाई येलमटे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आजी आजोबा दिनानिमित्त सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, देविदास तवर, बापूराव येणगे, कौशल्याबाई येणगे, सिमिंताबाई कांबळे, भागाबाई बिरादार, भिवराबाई येलमटे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
































No comments:
Post a Comment