तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बैल पोळा या सणाच्या निमित्ताने बैल मुर्ती प्रदर्शन आयोजित*
*तिवटग्याळ - आज दि.15-9-2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या च्या वतीने आज दिनांक 15/9/2023 रोजी पोळा या सणा च्या निमित्ताने माती कामा पासून बैल मुर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रथम शाळेतील परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की आज आपण बैल पोळा सणाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी माती पासून बैल करुन आणावे व प्रदर्शन मांडण्यात यावे व या बैल मुर्ती प्रदर्शनात प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थाना वही व पेन बक्षीस म्हणून दिले जाणार आहे असे सविस्तर सांगितले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी माती पासून तयार करण्यात आलेल्या बैल मुर्ती चे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी बैल पोळा या सणा विषयी सविस्तर माहिती दिली. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजराभ करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अश्या या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. सविस्तर माहिती दिल्या नंतर शाळेतील मांडलेल्या बैल मुर्ती प्रदर्शन पाहण्यात आले. प्रदर्शनातून प्रथम क्रमांक गणेश राजकुमार श्रीमंगले, द्वितीय क्रमांक शैलेश बालाजी पाटील, तृतीय क्रमांक गंगा संभाजी व रितीका शिवराज पाटील तसेच प्रोत्साहन पर इंद्रजीत नवनाथ कच्छवे, मंदिरा रमेश साळुंके, अर्थव कैलास तवर यांना अभिनंदन करुन शैक्षणिक साहित्य वही व पेन बक्षीस देऊन आले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*
No comments:
Post a Comment