तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार*
*तिवटग्याळ - आज दिनांक 5/9/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, प्रभाकर पाटील, अंगद कांबळे, भागवत कांबळे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्वांना शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. शिक्षक दिनानिमित्त शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, सोनू तवर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, सोनू तवर, प्रभाकर पाटील व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*
No comments:
Post a Comment