शिक्षणसेवक योजनेतुन शिक्षक झालेल्या शिक्षकांना काल्पनिक तीन वेतनवाढी राज्यातील शिक्षणसेवक योजनेतुन शिक्षक झालेल्या शिक्षकांना काल्पनिक तीन वेतनवाढी देऊन मुळ वेतन 'लागु करणेबाबत. आमदारांचे पत्र .
दि. ०६/११/२०२३
प्रति,
मा. ना. श्री. दिपकजी केसरकरसाहेब,
शालेय शिक्षण आणि मराठी भाषा- मंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महाराष्ट्र राज्यात १० मार्च २००० रोजीचा शिक्षणसेवक भरती शासन आदेश, त्यापुर्वीचे शासन शासन आदेश व नंतरचे सुधारीत शासन आदेशाद्वारे राज्याची आर्थिकस्थिती नाजुक असल्याने तसेच इतर राज्यातील भरती प्रक्रिया अभ्यास करून तत्कालीन राज्य शासनाने शिक्षणसेवक पद भरती प्रक्रिया राबवली होती.
त्यात पाच वर्ष दरमहा केवळ अडीच हजार तुटपुंजे मानधन देण्यात आले. नंतर पाच ऐवजी तीन वर्ष तीन हजार रूपये मानधन केले. तीन वर्ष मानधन तत्वावर सेवा करून शिक्षक पदावर रूजु झाले. त्यानी केलेली सेवा सेवानिवृत्तीवेतन तसेच सेवानिवृत्तीनंतरचे देय फायदे यासाठी ग्राहय धरण्यात येणार आहे. तसेच १२ वर्षे सेवा झालेल्यांसाठी वरीष्ठ चटोपाध्याय श्रेणीसाठी ग्राहय धरण्यात आली आहे.
मात्र तीन वर्ष केलेली सेवा प्राथमिक शिक्षक पदावर नेमणुक करताना तीन वर्षाच्या वेतनवाढी देण्यात आल्या नाहीत. तरी या तीन वेतनवाढी देऊन प्रथम नेमणुकीपासुन तीन काल्पनिक वेतनवाढी ग्राहय धरून प्राथमिक शिक्षक पदावर मुळ वेतन धरण्यात यावे व आजपर्यंतचा फरक अदा करून नव्याने वेतन निश्चीत करण्यात यावा. आज पर्यंत शिक्षकांना गोपनिय अहवाल उत्कृष्ट श्रेणीनुसार किंवा राज्य, देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त केलेल्या शिक्षकांना एक किंवा दोन वेतनवाढी देण्यात आल्या आहेत.
सर्व शिक्षण सेवकांनी राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना चांगली सेवा बजावली आहे. विशेषबाब म्हणजे धाराशिव जिल्हयातील शिक्षण सेवकांनी देशात प्रथम भूम, परंडा, वाशी ई-लर्निंग तालुके म्हणुन नावलौकीक मिळवला आहे. तसेच राज्यातील सर्व तरुण शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणात तंत्रस्नेही म्हणुन महत्त्वाची भुमिका बजावली आहे.
तरी ग्रामीण भागातील शेतकरी मजुर कष्टकरी वर्गातील मुलांच्या शिक्षणासाठी अविरत सेवा देणाऱ्या सर्व शिक्षण सेवक यांना शिक्षक होताना तीन काल्पनिक वेतनवाढी देऊन मुळ वेतनही लागु करण्यात यावे, हि विनंती.
आपला,
(मा. आ. सुजितसिंह ठाकूर )
No comments:
Post a Comment