आई 19 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Aai miss you
--------------------------
आई-वडील' हे शब्द उच्चारताच किती ऊर्जा मिळते ना. 'जगातील सर्वोत्कृष्ट आई-वडील कुणाचे तर ते नक्कीच माझेच!
' ही तमाम मुलांप्रमाणे माझंही उत्तर असंच आहे. तीही तेवढीच साहजिक आणि स्वाभाविक आहे. आम्हा लेकरा व वडिलांच्या पाठीशी ती नेहमीच पहाडासारखी उभी राहिली. आजवर 'आई-वडील' कधीच माझ्यावर रागावले नाहीत. काही चूक झाल्यास ते मला प्रेमळ शब्दात समजावले.
आम्ही तीन भाऊ आणि तीन बहीणी अशी भावंडं आहोत. पण त्यांनी सगळ्यांवर समान प्रेम केलं. जसं आई-वडिलांनी आम्हाला सांभाळलं. आमचं एकत्र कुटुंब आहे. सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. या सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवण्याचं काम नेहमीच माझ्या आई-वडिलांनी केलं आहेत. खरंच त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही आणि फेडूही शकणार नाही. मला ज्या पोषक आणि प्रेमळ वातावरणात त्यांनी वाढवले, ते माझ्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं. त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांनी दिलेले संस्कार आणि आधारावरच माझ्या आयुष्याचं चित्र मी रेखाटत आहे. त्यांचे आभार कितीही मानले तरी त्यांच्या उपकरांची उतराई मी होऊ शकणार नाही हे माहीत आहे. तरी त्यांच्याप्रती आदर म्हणून आज माझ्या आईच्या 19 व्या पुण्यतिथीनिमित्त निमित्ताने विनम्र अभिवादन. आई पुण्यतिथीनिमित्त आभार मानण्याचा प्रयत्न करतोय. थँक यू आई
-----------------------------
No comments:
Post a Comment