*आनंदायी शनिवार निमित्ताने शाळा भेट तिवटग्याळ*
*तिवटग्याळ - आज दिनांक 15/3/2025 रोजी जिल्हा परिषद शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जिल्हा लातूर येथे आनंदायी शनिवार निमित्ताने आनंदायी शनिवार उपक्रम अंतर्गत अभ्यास भेट दिली. उदगीर तालुक्यातील उपक्रमशील, आदर्श व जिल्हा पुरस्काराने सन्मानित मा. शांतकुमार बिरादार, पुंडलिक मुळे, रमेश खंडोमलके यांनी आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांकडून आढावा घेतला असता शाळेतील वातावरण खूप सुंदर दिसून आले,. शाळेतील विद्यार्थी अगदी शिस्तीत दिसून आले. शनिवार चा स्पेशल स्पोर्ट्स गणवेश दिसून आला. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत असलेल्या मैदानावर नवोपक्रम अभ्यास उपक्रम अगदी शिस्तीत उभे होते अगदी कार्य मग्न होते. शालेय परिपाठ विद्यार्थ्यांनी खूप सुंदर घेतला.इंग्रजी विषयात परीपाठ इयत्ता चौथी च्या मुलींनी घेतला.परीपाठात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन करून परीपाठ घेतला. परीपाठातील सर्व घटक अतिशय सविस्तर विद्यार्थी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज आपला शाळेत उदगीर तालुक्यातील उपक्रमशील, आदर्श व जिल्हा पुरस्काराने सन्मानित असलेले आदर्श शिक्षक आपल्या शाळेतील दर शनिवारी आनंदायी शनिवार अंतर्गत विविध उपक्रम पाहण्यासाठी आले आहेत तरी आपण सर्व विद्यार्थ्यांनी सांगावे असे सांगितले. तदनंतर उपस्थित शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती, अभ्यासक्रमातील विविध प्रश्न विचारुन विद्यार्थ्याकडून आढावा घेतला व या सर्व उपक्रमांतील फल निश्चिची, गुणवत्ता पाहुन समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व शिक्षकांनी मा. शांतकुमार बिरादार, पुंडलिक मुळे व रमेश खंडोमलके यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी व गुणवत्ता प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा दिले व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांचे अभिनंदन केले. भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे शाळा भेटी साठी आलेल्या उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक मा. शांतकुमार बिरादार, पुंडलिक मुळे व रमेश खंडोमलके यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळा भेटीतील उपक्रमशील व आदर्श शिक्षक मा. शांतकुमार बिरादार, पुंडलिक मुळे, रमेश खंडोमलके व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*
No comments:
Post a Comment