Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, February 5, 2021

माझा श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगी वाढदिवसानिमित्त लेख

विविध उपक्रमाच्या माध्यमातून विध्यार्थी घडवीणारे:    उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून शिक्षक झालेली व्यक्ती शिक्षणाचे महत्व जाणून घेवून पूर्वपरिस्थितीची जाण ठेवून त्यापरीचे शिक्षण विध्यार्थ्यांना देत चांगले विध्यार्थी घडवितात.नोकरीशी  प्रामाणिक राहून विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सक्षम बनविणे असे काम करणारे अनेक शिक्षक आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी ज्ञानेश्वर बडगे हे एक त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांचा परिचय देणारा हा लेख...
     श्री.ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी उदगीर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विध्यावर्धिनी प्राथमिक शाळा उदगीर , माध्यमिक शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उदगीर ,उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर , त्यानंतर चार्वाक अध्यापक महाविद्यालय अहमदपूर येथे अध्यापन पदविका प्राप्त केली .शिक्षण संपल्यावर श्री.ज्ञानेश्वर बडगे हे  जि. प. प्रा. शाळा कसर येथे दि. २९ जुलै १९९७ रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले.परभणी जिल्ह्यातील कसर येथे एक वर्ष सेवा दिल्यानंतर दि. १ ऑगस्ट१९९८ रोजी लातूर जिल्ह्यातील आंबा नगर येथील शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाले.येथे त्यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दि.१३ जून २००६ रोजी जि. प.प्रा.शा. संगम ता.देवणी जि. लातूर येथे बदली झाली. येथे बरीच वर्षे सेवा झाल्यानंतर उदगीर तालुक्यातील रावणगाव नवीन वसाहत येथे विविध उपक्रम राबविले व तालुक्यातील एक आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणून विविध अधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तद्नंतर त्यांची बोळेगाव बु. ता.शिरूर अनंतपाळ येथे जि. प.शाळेवर 22 जुन 2019  रोजी विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झाले. आपल्या २४ वर्षा च्या सेवेत श्री.बडगे सरानी विद्यार्थी हेच आपले दैवत मानून प्रामाणिकपणे विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.नियोजनबद्ध अभ्यासक्रम भिंतीवर लिहून भिंती बोलक्या करणे ,शाळा सजावट ,विद्यार्थी संस्कारीत होण्यासाठी नितीमूल्याचे शिक्षण परिपाठातुन देणे, नवोदय,शिष्यवृत्तीचे वर्ग शाळेत घेवून विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनविणे,निसर्ग शाळा,सहल,महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजरे करणे अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विध्यार्थी घडविले. श्री.ज्ञानेश्वर बडगे सरांच्या विविध उपक्रमशील कार्याची नोंद घेऊन त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. जिल्हा परिषद लातूर सन 2019 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गोवा येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, नाशिक येथील राष्ट्रीय समता फेलोशिप पुरस्कार, औरंगाबाद येथील राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. ना.य.डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ,उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे हस्ते सत्कार ,जिल्हा पोलीस अधीक्षक बी.जी.गायकर यांच्या हस्ते सन्मान , गोंधळी समाजाच्या वतीने शिक्षणतज्ञ भगवान सिंह बायस यांचे हस्ते सन्मान,एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने २०११ चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मुंबई येथे आझाद मैदानावर शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे हस्ते प्रदान , काव्यमित्र संस्था पुणे चा राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ,परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि. उस्मानाबादचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार ,श्री.जयभवाणी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता.पंढरपूर जि. सोलापूर चा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.जीवनात आई वडील याना आदर्श मानणारे श्री.ज्ञानेश्वर बडगे याना भविष्यात संस्कारक्षम विदयार्थी घडवायचे आहेत.आज त्यांचा वाढदिवस यानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊया !

            शंकर बोइनवाड
             उदगीर


No comments:

Post a Comment