तिवटग्याळ ......... दिनांक 12/1/2024 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने शाळेतील विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत अत्यंत आनंदाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षक शिक्षीकाअंजली लोहारकर, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत उपस्थित होती. अतिशय आनंदाने उत्साहाने जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी अतिशय सुंदर वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते .*
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी लागणार अहवाल सादर करत असताना त्यामध्ये विविध प्रकरणाचा समावेश करावा लागतो. त्या शिवाय आपणास असा अहवाल सादर करता य...
-
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक
-
*_कोविड आजाराचे 21 मे 2020 किंवा त्यापासून पुढच्या दिनांकाचे बिलं निघू शकतात याबाबत शासन निर्णय. दि ३० एप्रिल २०२१_* _पूर्वी 2 सप्टेंबर पासू...
-
बाला उपक्रमांत शालेय रंगरंगोटी, वर्गखोली व संरक्षण भिंत, मुख्याध्यापक कार्यालय रंगकाम फोटो👇
-
➖➖➖➖➖➖➖➖ ☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙ *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040 🛑 *...
-
*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र यांचा परीक्षा पे चर्चा 2024 विद्यार्थ्यांना दुरदर्शन कार्यक्रम आय...
No comments:
Post a Comment