Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, January 18, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य "जोडा जोडा अक्षर जोडा, बनवा बनवा शब्द बनवा " या उपक्रमातून शिक्षण

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य "जोडा जोडा अक्षर जोडा, बनवा बनवा शब्द बनवा " या उपक्रमातून शिक्षण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 13/1/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी आज शनिवार निमित्ताने शैक्षणिक साहित्य" जोडा जोडा अक्षर जोडा, बनवा बनवा शब्द बनवा " या  उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी हा उपक्रम समजावून सांगितले. प्रथम शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी"आ" अक्षर व ज्ञानेश्वर बडगे यांची" ई" अक्षर जोडले व त्या पासुन आई हे शब्द तयार करुन. आई पासून विविध वाक्ये सांगितले. आई मला आवडते, आई खूप काळजी घेते, आई अभ्यास करुन घेते. आई सकाळी लवकर उठते. आई घरातील सर्वांची काळजी घेते. अशा पद्धतीने आई पासून तयार होणारे विविध वाक्ये सांगितली तद्नंतर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवून एका खोक्यात विविध अक्षरे उचलून त्या अक्षरांचे शब्दाची जोडी लावणे. प्रत्येक विद्यार्थ्यांना विविध अक्षर चिठ्ठी उचलायला लावणे तद्नंतर दोन कोणतेही अक्षर सांगणे. दा आणि दा. दादा. ज्यांच्या हातात ही अक्षरे आली आहेत ते विद्यार्थी समोर येउन दादा शब्द उच्चारणे मग दादा या शब्दा पासून तयार होणारे विविध वाक्ये सांगणे. अशा रीतीने सर्व विद्यार्थ्यांचा सहभागी घेऊन "जोडा जोडा अक्षर जोडा,,बनवा बनवा शब्द बनवा" हा शैक्षणिक खेळ घेतला. अशा पध्दतीने शैक्षणिक साहित्याच्या माध्यामतून  मनोरंजनातून विद्यार्थी अक्षर, शब्द व वाक्ये यांची ओळख व वाचण. या उपक्रमांत विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले*

















































No comments:

Post a Comment