" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

उदगीरचे संस्मरणीय साहित्य संमेलन


Memory.
----------
*उदगीरचे संस्मरणीय साहित्य संमेलन*📚📖📙📘📗📕
---------------------------------------------
     _उदगीर येथे नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले ! लातूर जिल्ह्यासाठी खरे तर ही अभिमानाची बाब होती ! साहित्य संमेलन संपन्न होऊन दोन-तीन दिवस उलटले असले तरी या साहित्य-उत्सवाच्या आठवणी आजही कायम आहेत ! अल्पावधीत या संमेलनाचे देखणे आयोजन केल्याबद्दल संयोजन समितीचे मनःपूर्वक अभिनंदन !_
      _मलाही आमच्या मित्र मार्गदर्शकाबरोबर साहित्य संमेलनात सहभागी होण्याचा योग आला ! पुणे येथील साधना प्रकाशनाशी माझे आणि चाकूर तालुक्यातील शिक्षकांचे जुने नाते आहे . चाकूर तालुका आणि जिल्हाभरात बालकुमार आणि युवा दिवाळी अंकाच्या रुपात वाचनसंस्कृती अभियान राबविण्यासाठी आणि रुजविण्यासाठी साधना प्रकाशन आणि शिक्षक बंधू-भगिनींचे मोठे सहकार्य लाभले ! साधनेचे संपादक श्री विनोदजी शिरसाठ आणि राष्ट्रसेवा दलाचे श्री  गोपाळजी नेवे यांची कोरोना कालखंडानंतर झालेली भेट सुखावून गेली ! आचार्य विनोबांच्या कार्यावर नुकतेच प्रकाशित झालेले सब भूमी गोपालकी हे आणि साने गुरुजींनी दोन  पुस्तके खरेदी करून त्यांचा निरोप घेतला !_
      _आजपर्यंतच्या संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रे असलेले दालन   खुप भावले ! त्याचबरोबर जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा नळेगावचे मुख्याध्यापक श्री संदीपानजी कोरे यांचे सुपुत्र श्री प्रशांत कोरे हे आंतरराष्ट्रीय चित्रकार आहेत . त्यांनी रेखाटलेली संमेलनातील चित्रे सर्वांचे मन वेधून घेत होती . जिल्हा परिषद शाळा राबवत असलेले विद्यार्थी केंद्रित उपक्रम सांगणारे स्टॉल संमेलनाचे आकर्षण होते ! विविध सामाजिक संस्थानी येथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी केलेली पिण्याच्या पाण्याची सोय व  थंड सरबताची सोय  प्रेरणादायी अशीच होती !_
        _संमेलनस्थळी अनेक मित्र- मान्यवरांच्या भेटी झाल्या ! त्यांच्याबरोबर चर्चाही करता आली ! आमचे साहित्यिक मित्र प्रमोद हुडगे (गुरुजी) तेथे निवासी असल्याने अनेक थोर साहित्यिकांचा त्यांना सहभाग लाभला ! पुढील साहित्य निर्मितीसाठी हे संमेलन उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले ! साहित्य संमेलन संपल्याने गुरुजी निरुत्साही झाले ! या उत्सवात  4 दिवसात शाळा एके शाळा हे ब्रीद जपणारे गुरुजी वेगळ्याच विश्वात रमून गेले होते  ! त्यांना आता पुढील संमेलनाची आस लागून राहिली आहे !_ 
     _*उदगीरच्या आमच्या मित्रांनी आमचे केलेले आदरातिथ्य सुखावून गेले !  त्या सर्व मित्रांचे मनःपूर्वक धन्यवाद ! आभार ! या साऱ्या स्नेहीजनांच्या बरोबर साहित्य संमेलनातील सहभाग आनंददायीच होता ! 🙏🏻🙏🏻🙏🏻*_
            *आपला साहित्ययात्री* 
          *चंद्रकांत भोजने*


No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान

*तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान* -------------------------------------  *तिवटग्याळ...